हिवरा आश्रम येथे आज भव्य महापंगत !

01 Feb 2024 16:54:17
हिवरा आश्रम,
Hivra Ashram  युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित विवेकानंद जन्मोत्सव सोहळयाची सांगता महाप्रसाद वितरणाने आज ता.२ रोजी आयोजन करण्यात येणार आहे. विवेकानंद जन्मोत्सवाच्या भव्य महापंगतीने सांगता होणार आहे. त्यानिमित्त भाविकांना २०० क्विंटल गहूपुरी, १५० क्विंटल वांगेभाजीच्या वैदर्भिय चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. हा महाप्रसाद बनविण्यास गुरूवारी ता. १ रोजी पहाटे सकाळी ५ वाजता विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी कढईत पहिली पुरी सोडून महाप्रसाद तळण्यास सुरुवात झाली. तब्बल १५ तासांच्या पाकसिद्धीनंतर महाप्रसाद तयार केला गेला.
 
 
mahapangat
 
विवेकानंद जन्मोत्सवासाठी राज्यभरातून भाविक-भक्त विवेकानंद आश्रमात दाखल झाले आहे. भाविक भक्तांच्या मांदियाळीने हिवरा आश्रम फुलला आहे. विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावरील विविध धार्मिक, सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमांचा भाविक आस्वाद घेत आहेत. तीन हजार स्वयंसेवकांसह विवेकानंद आश्रमाचे हजारो कार्यकर्त्यांच्या मदतीने हा महाप्रसाद बनविण्यात आला. आज २ ते ५ वाजेदरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य महाप्रसाद वितरणाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. राज्यभरातून आलेल्या भाविकांसह पंचक्रोशीतील भाविकांना महाप्रसाद एकाच पंगतीमध्ये एकाच वेळेस वितरित केला जाणार आहे. राज्यात भव्य प्रमाणावर संपन्न होणाऱ्या या विवेकानंद जयंती महोत्‍सवातील महाप्रसादासाठी दोन लाख भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.
हेही वाचा :  स्वामी विवेकानंद, शुकदास महाराजांच्या नामघोषाने दुमदुमली विवेकानंद नगरी ,व्हिडिओ
 
आज संपन्न होणारे कार्यक्रम
सकाळी प्रार्थना,अनुभूती गायन,किर्तन,प्रवचन,हभप ज्ञानेश्वर महाराज यांचे सुमधूर वाणीतून श्रीकृष्ण कथामृत,जत येथील डॉ.सरीता पट्टणशेट्टी यांच्या संत धन्वंतरी ग्रंथाचा सोहळा,Hivra Ashram दुपारी भव्य महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांचे किर्तन,रात्री ७ वाजता स्वामी विवेकानंद,प.पू.शुकदास महाराज प्रतिमेचे व संग्रहीत आर्शीवचन,रात्री ८ वाजता स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज पळसखेड यांचे किर्तन संपन्न होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0