एक देश व लोकशाही म्हणून अपयशी पाकिस्तान

    दिनांक :01-Feb-2024
Total Views |
रोखठोक
 
 
- हितेश शंकर
 
 
 
Pakistan democracy : पाकिस्तानात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ शिगेला पोहोचली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी विरोधी पक्ष तर सोडा पण मित्रपक्ष आणि पाकिस्तानचे इतर भागधारकही एकजूट होताना दिसत आहेत. प्रत्येक क्षणी एक नवीन घडामोड, नवे वळण पाहायला मिळते. तथापि, सर्व वळणांचे गंतव्यस्थान अर्थात ध्येयमार्ग एकच आहे - व तो म्हणजे तेहरीक-ए-इन्साफची सत्ता उलथवून टाकणे. हा केवळ लोकांचा सरकारवरील विश्वास आणि सभागृहात विश्वास प्रस्ताव जिंकण्यापुरताच विषय नाही तर पाकिस्तानी व्यवस्थेच्या लोकशाहीवरील अविश्वासाच्या प्रदीर्घ गाथेच्या पुढील प्रकरणाची सुरुवात आहे. पाकिस्तानात जेव्हा जेव्हा कुठल्या घडामोडी घडतात तेव्हा त्याकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष असते. याची अनेक कारणे आहेत.
 
Pakistan democracy
 
काहींच्या मते, Pakistan democracy पाकिस्तानची भूमिका महासत्तांमधील नफेखोर मध्यस्थाप्रमाणे आहे. रशिया आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धाच्या काळात अफ-पाक क्षेत्राला सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्व होते. मुस्लिम जगतातील हा एक कुतूहलाचा मुद्दा असला तरी अरब देश पाकिस्तानला महत्त्व देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, एवढे असूनही मुस्लिम जगताचे नेतृत्व करण्याची पाकची खुमखुमी काही कमी होत नाही. एवढेच नव्हे तर मुस्लिम जागतिक मंचावर त्याचा वावर नेहमीच दिसून येतो. लोकशाहीच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीच्या प्रयोगांचे यशस्वी उदाहरण म्हणून लोकशाही जगतातील अभ्यासक पाकमधील घडामोडींकडे पाहतात. आणि धार्मिक आधारावर तसेच मोठमोठी आश्वासने व स्वप्ने घेऊन एका देशाची वाटचाल कशी सुरू झाली, Pakistan democracy धार्मिक आधारामागचे तत्त्वज्ञान देखील लोकांना सांगितले होते, याच आधारावर लोकांना एकजूटही केले होते मात्र, प्रत्यक्षात त्या सर्व गोष्टी कशा खोट्या निघाल्या. एकही स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकले नाही, अशा दृष्टिकोनातून इतिहास व मानवतेचा विकास समजून घेणारे आणि अभ्यास करणारे लोक पाकिस्तानातील घडामोडींकडे पाहतात. त्यामुळे देखील सर्वांच्या नजरा पाकिस्तानकडे लागल्या आहेत. तुम्ही असेही म्हणू शकता की पाकिस्तान हा उन्माद, विषमता, निराशा आणि संतापाचा घनदाट विध्वंसक समूह आहे ज्याचा जागतिक जडणघडणीवर परिणाम होऊ शकतो. आणि याच नकारात्मकतेमुळे तो सतत लोकांच्या नजरेत राहतो. महत्त्वाची गोष्ट ही आहे की पाकिस्तानी सत्तेतील भागीदारांना (लष्करासह) या नकारात्मकतेचे मूल्य पुरेपूर कळते आणि ते जनता आणि जागतिक समुदाय या दोघांकडून याची मनमानी किंमत वसूल करतात.
 
 
धर्माचा काटा, प्रजेची मासोळी
एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून पाकिस्तानची संकल्पना रुजविण्यासाठी धर्माच्या नावाखाली मुस्लिम एकता आणि हिंदू द्वेषाला परिपोषित करण्यात आले. भारतासाठी इस्लाम, उम्मा (मुस्लिम बंधुभाव) आणि माणसाकडे माणूस म्हणून न बघता काफिर म्हणून पाहणे आणि क्रूरपणे वागणे ही भारतासाठी एक बाह्य आणि त्याज्य कल्पना होती. इथल्या लोकांना त्यांच्या पूर्वजांपासून, त्यांची भूमी, विचार-संस्कृती किंवा मुळापासून तोडून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. कदाचित त्यामुळेच लोकशाही, स्त्रीस्वातंत्र्य, मानवाधिकार या निकषांवर देश म्हणून हे रोपटे कधीच बहरू शकले नाही. Pakistan democracy पाकिस्तानच्या राजकीय स्थिरता निर्देशांक उणे 2.4 गुण आहे, जो त्याची लोकशाही अस्थिरता सुस्पष्टपणे दर्शवितो. ह्युमन राईट्स वॉचच्या वार्षिक अहवालानुसार, पाकिस्तानातील संस्थात्मक यंत्रणा महिलांसंदर्भातील गुन्हे रोखण्यात असमर्थ असल्याचे सिद्ध होत आहे. जॉर्जटाऊन विद्यापीठाने जाहीर केलेल्या जागतिक महिला शांतता सुरक्षा निर्देशांकात 170 देशांपैकी पाकिस्तान 167 व्या क‘मांकावर आहे. 1947 पासून आजपर्यंतचा पाकिस्तानचा लोकशाही मार्गाचा इतिहास डळमळीत आहे. येथे कधीही स्थिर लोकशाही सरकार आले नाही. इस्लामच्या नावावर लोकांना एकत्र करून वारंवार परिवार केंद्रित पक्ष सत्ता हाती घेतात, पण मागून सर्वांचीच सूत्रे पाक लष्कराच्या हाती एकवटलेली असतात. लष्कराच्या मनात असेल तर सत्ताप्राप्ती होऊ शकते आणि लष्कराच्या मर्जीतून एखादे सरकार उतरले तर लष्कर त्यांना हवे त्यावेळी सत्तापालट घडवून आणते व कठपुतळ्यांना राजा बनवते. लोकशाहीवादी व्यवस्था बळकट करणे हे पाकिस्तानच्या कुठल्याही राजकीय पक्षाचा प्राधान्यक‘माचा विषय नाही. वारंवार झालेल्या लष्करी उठावांमुळे Pakistan democracy पाकिस्तानची लोकशाही व्यवस्था पार उद्ध्वस्त झाली आहे. 1956 ते 1971, 1977 ते 1988 पर्यंत आणि पुन्हा 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानात लष्करी राजवट होती. ‘यातनाम अभ्यासक स्टीफन पी. कोहेन यांनी आपल्या अध्ययनात पाकिस्तानी लष्कराची तीन कालखंडांमध्ये विभागणी केली आहे.
 
 
पहिला कालखंड म्हणजे 1947-1953 पर्यंतची ब्रिटीश राजवट, दुसरा अमेरिकेच्या प्रभावाखालील 1954-1971 पर्यंतचा काळ आणि तिसरा 1972 ते आत्तापर्यंत. आपण असे देखील म्हणू शकता की 1953 पर्यंत Pakistan democracy पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेवर पाऊंडचा प्रभाव होता. त्यानंतर तेथील जनरल अमेरिकन डॉलरकडे झुकले आणि 1972 नंतर भारत-चीन संघर्षाचा फायदा घेत पाकने ड्रॅगनच्या गळ्यात गळे घालून मैत्रीचे सूर आळविणे सुरू केले आणि येथेच पाकिस्तानची मोठी चूक झाली. पाकिस्तानने आपला अंतर्गत कारभार व्यवस्थित करण्याची, स्वत:च्याच देशात अधिक लक्ष देण्याची गरज असताना त्या देशाने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांच्याच देशात असंतुलन निर्माण झाले. भारताशी शत्रुत्व, भारताचा कायम द्वेष हीच पाकिस्तानची विचारसरणी राहिली आहे. भारताला धडा शिकविण्याच्या हव्यासापोटी त्याने स्वत:चेच प्रचंड नुकसान करून घेतले. भारतविषयक शत्रुत्वाच्या भावनेने पछाडलेल्या पाकिस्तानने 1954 पासून अमेरिकेशी जवळीक वाढविली आणि तेव्हापासून पाकिस्तानला बाह्य सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्यास प्राधान्य दिले. परिणामी पाकिस्तानचा अंतर्गत सामाजिक सुरक्षेवर होणारा खर्च कमी झाला आणि बाह्य सुरक्षेवरील खर्च प्रचंड वाढला. पण मे 2007 मध्ये, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव आसिफ अली आणि नेते इम्रान खान यांनी या संदर्भात भारतालाच दोष दिला. भारताला पाकिस्तानविषयी वाटत असलेल्या द्वेष भावनेमुळेच पाकिस्तानला आपली सुरक्षा आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संरक्षण क्षेत्रावर अधिक खर्च करावा लागत आहे, असे या दोघांनी म्हटले होते.
 
 
पाकिस्तानातील राजकीय Pakistan democracy अस्थिरतेमुळे तेथील अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. स्वातंत्र्याच्या वेळी, पाकिस्तानची 70 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापार भागीदारी भारतासोबत होती, जी आता 1 टक्क्यापेक्षाही कमी झाली आहे. सत्तेत वारंवार होणार्‍या स्थित्यंतरामुळे दीर्घकाळ चालणार्‍या आर्थिक विकास योजनांमध्ये व्यत्यय आला, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर देखील गंभीर परिणाम झाला. 1993 पासून पाकिस्तानचा वार्षिक जीडीपी विकास दर नेहमीच भारतापेक्षा कमी राहिला आहे. पाकिस्तानचा जीडीपी सुमारे 262610 दशलक्ष यूएस डॉलर आहे, जो भारताच्या तुलनेत 11 पट कमी आहे, असे 2020 च्या जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. की. अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत हुसैन हक्कानी यांनी खचऋ कडून पाकिस्तानने घेतलेल्या कर्जाची आकडेवारी सादर करताना सांगितले की, पाकिस्तानवरील विदेशी कर्ज 50 हजार अब्ज रुपयांहून अधिक आहे आणि 2000 नंतर, पाकिस्तानने आतापर्यंत 5 कर्ज घेतले आहे. खचऋ कडून वेळा घेतले आहे.