दखल
- अलका कुबल
ashok saraf-marathi films अशोक सराफ यांना अत्यंत मानाचा ‘महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर होणे, ही त्यांच्यासह आपल्या सर्वांसाठीच अत्यंत आनंददायी बाब आहे. हा या दिग्गज अभिनेत्याचा यथोचित गौरव आहे, यात शंका नाही. त्यांचे चित्रसृष्टीतील योगदान अतुलनीय आहे. मी त्यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ashok saraf-marathi films ‘तुझ्यावाचून करमेना' हा त्यांच्याबरोबर मी केलेला पहिला चित्रपट. यातील भूमिकेसाठी मला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले होते. अर्थात याचे सर्व श्रेय मी नेहमीच अशोक सराफ यांना देत आले आहे कारण, अभिनेत्री म्हणून तो काळ माझ्यासाठी खूप नवा होता. अभिनयातील बारकावे फारसे ठाऊक नव्हते आणि तेवढे गांभीर्यही नव्हते. ashok saraf-marathi films एक ना अनेक गोष्टींमध्ये मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा पुढच्या वाटचालीत निश्चितच खूप फायदा झाला. त्यांची कामातील तन्मयता, एकाग्रता आणि पूर्ण कौशल्य पणाला लावत एखादी भूमिका साकारण्याची वृत्ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. ashok saraf-marathi films इतक्या वर्षांच्या कारकीर्दीमध्ये आम्ही त्यांच्याकडून हे सगळे शिकत गेलो. एखाद्याने उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या कामातून ते दाखवून देणे, समोर मांडणे खूप मोठे असते; कारण त्यांच्याकडे बघत बघतच खूप काही शिकायला मिळत असते.
खरे पाहता ते आमच्या आधीच्या पिढीतील अभिनेते. केवळ मीच नव्हे, तर आमच्या पिढीतील प्रत्येक कलावंताने त्यांच्याकडून नानाविध धडे गिरवले आहेत. या सन्मानासाठी सरकारने योग्य व्यक्ती निवडली आहे, असेच म्हणेन. त्यांनी इंडस्ट्रीला खूप काही दिले आहे. हसवले आहे, रडवले आहे. ashok saraf-marathi films नानाविध भूमिकांमधून प्रगल्भ अभिनयाचे दर्शन घडवले आहे. अशोक सराफ यांनी विविध प्रकारांच्या भूमिकांमध्ये रंग भरले. एकीकडे रुपेरी पडद्यावर नायक साकारला तर त्याच वेळी खलनायकही तितक्याच ताकदीने उभा केला. हसवण्याबरोबरच त्यांच्या अभिनयाने लोकांचे डोळेही पाणावले. असे वैविध्य फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळते. मुख्य म्हणजे इतके सगळे करतानाही त्यांनी कधीच दर्जा सोडला नाही. विनोदी अभिनेता अशी ओळख असली, तरी त्यांनी कधीच कमरेखालचे विनोद केले नाहीत. त्यांनी आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा कायम राखली, सांभाळली. त्याचबरोबर त्यांनी आयुष्यभर माणसेही जोडली. ashok saraf-marathi films या कलाकाराकडून कधीच कोणाला त्रास झाला नाही. खरे पाहता प्रत्यक्षात ते फारसे बोलत नाहीत. स्वत:चे कौतुक करणे वा करवून घेणे, ही तर खूप दूरची बाब झाली. आम्हाला त्यांच्याकडून किस्से ऐकायला आवडायचे. ते कधीच आपल्या वलयात राहिले नाहीत, तर काळानुरूप पुढे जात राहिले.
बदल स्वीकारत वाटचाल सुरू ठेवत राहिले. नवीन पिढीशी ते सहज जोडले गेले. माझ्या मते ही बाबही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यामुळेही आदर वाढतो. इतका मोठा कलावंत इतक्या आस्थेने गप्पा मारतो, मैत्री जपतो तेव्हा नवी पिढीही हे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत असते. अशोक सर्वार्थाने ग्रेट आहेतच; खेरीज त्यांना मिळालेली निवेदिताची साथही महत्त्वाची आहे. एखाद्या कलावंताच्या आयुष्यात कशी सहचारिणी असावी, याचे उत्तम उदाहरण निवेदिताने समोर ठेवले आहे. ashok saraf-marathi films परिस्थितीची गरज ओळखल्यामुळेच लग्नानंतर जवळपास १४-१५ वर्षे तिने कामही थांबवले होते. अशोक कामात व्यस्त असताना प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि मुलाचे पालनपोषण महत्त्वाचे मानून तिने घेतलेला हा निर्णयही तितकाच मोलाचा म्हणावा लागेल. मिळालेल्या या पुरस्कारात निवेदिताचाही तितकाच वाटा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशोक यांनी हिंदी चित्रसृष्टीतही खूप काम केले. तिथेही त्यांनी कधीच टाकावू भूमिका केल्या नाहीत. सध्या मराठी कलाकार हिंदी चित्रसृष्टीत महत्त्वाच्या भूमिका करताना दिसतात. पण मधला काळ तसा नव्हता. तेव्हा मराठी कलाकारांना बरेचदा दुय्यम दर्जाच्या भूमिका दिल्या जायच्या. मात्र अशोक यांनी कधीच असे काम स्वीकारले नाही.
ashok saraf-marathi films ‘येस बॉस', ‘करण अर्जुन'सारखे चित्रपट वानगीदाखल सांगता येतील. थोडक्यात, त्यांचे हिंदी चित्रसृष्टीतील कामही प्रशंसनीय ठरले. उत्तम संवादफेक ही त्यांची खास ओळख... आजची पिढीदेखील ‘अशी ही बनवाबनवी' वा त्यासारख्या त्यांच्या चित्रपटांमधील संवाद ऐकून पोट धरून हसते तेव्हा त्याचे श्रेय खचितच या दिग्गजांकडे जाते. आधी उल्लेख केला तो आमचा ‘तुझ्यावाचून करमेना' हा विनोदी चित्रपट होता. ashok saraf-marathi films त्यात आम्ही नवरा-बायको होतो. खरे तर मी साकारलेली ही भूमिका आधी एक ज्येष्ठ अभिनेत्री करणार होती. पण काही कारणामुळे हा चित्रपट माझ्याकडे आला. तेव्हापासून सुरू झालेल्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या मनातला अशोक यांच्याबद्दलचा आदर वाढतच गेला. ते समोर असतात तेव्हा आपण आपोआप त्यांच्या कामाच्या चौकटीत सामावले जातो. ‘गिव्ह अँड टेक'चा उत्तम नमुना बघायला मिळतो. म्हणूनच कामाची उंचीही वाढत राहते. ashok saraf-marathi films इतकी वर्षे एकत्र काम करताना तुमचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र, हितचिंतक होता. हे नातेही फार देखणे असते. या अर्थाने बघता अशोकच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाशी माझे प्रेमाचे संबंध आहेत.
एकदा त्यांना अपघात झाला होता तेव्हा ते पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांचा अपघात ही बाब संपूर्ण चित्रसृष्टीला हादरा देणारी होती. साहजिकच आम्ही सगळे त्यांना भेटायला गेलो होतो. नेमके त्याच दिवशी ते शुद्धीवर आले होते. त्यामुळे आमचे त्यांच्याशी बोलणे झाले. ashok saraf-marathi films तेव्हादेखील त्यांच्यातील हरहुन्नरी माणसाचा परिचय झाला. खचून न जाता पुढे कसे बघायचे, हे त्यांच्याकडे बघून समजले. कोणाच्याही घरी घडलेल्या बऱ्या-वाईट गोष्टीची दखल घेणे, चांगल्या कामाचे कौतुक करणे, वाढदिवसाला आवर्जून फोन करणे या गोष्टी आजही होतात. त्यांचा शुभेच्छा देणारा फोन आल्याखेरीज वाढदिवस पूर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. वरकरणी ही छोटीशी बाब वाटते. पण यातूनच नाती जोडण्याची त्यांची सहजसुलभ वृत्ती दिसून येते. ashok saraf-marathi films अर्थातच याचे श्रेय निवेदितालाही द्यावे लागेल. त्यांच्याकडून आमच्यासारख्यांचे कौतुक वारंवार होत राहो आणि त्यांचा स्नेह असाच टिकून राहो, हीच सदिच्छा, कारण पडद्यापलीकडची अशी नाती खूप मोलाची असतात. खरे तर तीच खरी दौलत असते...