अबुधाबीतील मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदी यूएईला जाणार

    दिनांक :10-Feb-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या विशाल AbuDhabi Mandir  मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आणि अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल् नाहयान यांच्यासोबत विस्तृत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौर्‍यावर जाणार आहेत. ते मंगळावारी यूएईला रवाना होतील, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
Abudhau mandir
 
AbuDhabi Mandir  : 2015 पासून पंतप्रधान मोदी यांची संयुक्त अरब अमिरातचा हा 15 वा दौरा आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शनिवारी त्यांच्या दौर्‍याची घोषणा करताना सांगितले. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट, सखोल आणि विस्तारित करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अल् नाहयान चर्चा करतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर परस्परांचे मत जाणून घेतील, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली.
 
 
नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातचे उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल् मक्तुम याचीही भेट घेणार आहेत, असे मंत्रालयाने सांगितले. त्यांचे निमंत्रण स्वीकारून नरेंद्र मोदी दुबईत होणार्‍या ‘वर्ल्ड गव्हर्न्मेंट समिट-2024’मध्ये पाहुणे म्हणून सहभागी होतील आणि या परिषदेला संबोधित करतील.