भाजपाला इलेक्ट्रॉल बॉण्ड्समधून मिळाले 1300 कोटी रुपये

    दिनांक :10-Feb-2024
Total Views |
- काँग्रेसच्या तुलनेत सातपट अधिक
 
नवी दिल्ली, 
सत्ताधारी भाजपाला 2022-23 मध्ये जवळपास 1,300 कोटी रुपये इलेक्ट्रॉल बॉण्ड्सच्या माध्यमातून मिळाले. हा आकडा काँग्रेसला समान कालावधी आणि समान माध्यमातून मिळालेल्या देणगीच्या सातपट जास्त आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात भाजपाला एकूण 2,120 कोटी रुपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या. त्यापैकी 61 टक्के निधी इलेक्ट्रॉल बॉण्ड्सच्या माध्यमातून प्राप्त झाला, असे Election Commission निवडणूक आयोगाने सादर केलेल्या वार्षिक अंकेक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे. 2021-22 मध्ये भाजपाला 1,775 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. 2022-23 मध्ये पक्षाचे एकूण उत्पन्न 2360.8 कोटी रुपये होते, जे 2021-22 मधील 1917 कोटी रुपयांच्या तुलनेत जास्त होते.
 
 
Election Commission
 
दुसरीकडे, काँग्रेसने Electrol Bond इलेक्ट्रॉल बॉण्ड्सच्या माध्यमातून 171 कोटी रुपये कमावले. हा आकडा 2021-22 मधील 236 कोटी रुपयांच्या तुलनेत कमी आहे. भाजपा आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत. प्रादेशिक पक्ष समजल्या जाणार्‍या समाजवादी पार्टीने 2021-22 मध्ये 3.2 कोटी रुपये इलेक्ट्रॉल बॉण्ड्सच्या माध्यमातून कमावले होते. 2022-23 मध्ये त्यांना या माध्यमातून एक रुपयाही मिळालेला नाही. चंद्राबाबू नायडू यांच्या तेदेपा या आणखी एका प्रादेशिक पक्षाने 2022-23 मध्ये 34 कोटी रुपये इलेक्ट्रॉल बॉण्ड्सच्या माध्यमातून कमावले. हा आकडा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10 पट अधिक आहे. भाजपाने मागील आर्थिक वर्षात केवळ व्याजातून 237 कोटी रुपये कमावले, जे 2021-22 मधील 135 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.
 
 
Election Commission निवडणूक आणि इतर सामान्य प्रचारावर झालेल्या खर्चात भाजपाने 78.2 कोटी रुपये विमान आणि हेलिकॉप्टर्सच्या वापरावर खर्च केले. हे 2021-22 मधील 117.4 कोटी रुपयांच्या तुलनेत कमी होते. या व्यतिरिक्त पक्षाने 76.5 कोटी रुपयांची आर्थिक मदत उमेदवारांना केली. 1021-22 मध्ये केलेल्या 146.4 कोटींच्या तुलनेत ही कमी होती. पक्षाने ही मदत एकूण देयकांच्या शीर्षकात दाखवली आहे.