सत्ताधारी पक्षाचा हात असल्याचे समोर येईल

    दिनांक :10-Feb-2024
Total Views |
- घोसाळकर प्रकरणी वडेट्टीवारांचा दावा

मुंबई, 
वर्चस्वाच्या लढाईतून अभिषेक घोसाळकरसारख्या लोकप्रिय नेत्याला संपविण्याचे मोठे षडयंत्र असून, या षडयंत्रात सत्ताधारी पक्षाचा मोठा नेता असल्याचचे समोर येईल, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते Vijay Vadettiwar विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणानंतर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात सरकारला लक्ष्य केले जात आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याने राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करीत असताना, अचानक हे हत्याकांड पूर्व नियोजित कट असून, यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा हात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला आहे.
 
 
Vijay Vadettiwar
गोपीचंद, जग्गा जासूसांनी विचारपूर्वक बोलावे : फडणवीस
अलिकडच्या काळात जे गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झाले आहेत, त्यांनी जरा विचारपूर्वक बोलले पाहिजे, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विजय वडेट्टीवारांवर केला. Vijay Vadettiwar वडेट्टीवार यांना तसेही काही माहीत नसते. अल्प माहितीच्या आधारावर ते नेहमीच खळबळजनक गोष्टी बोलत असतात. विरोधी पक्षनेतेपद हे मोठे आहे. त्या पदावरील व्यक्तीने विचारपूर्वक बोलले पाहिजे. कोणत्याही गोष्टीची चौकशी योग्य प्रकारे होईलच आणि याचीही चौकशी होईल आणि कायद्याने कठोर कारवाईदेखील होईल. असे फडणवीस म्हणाले.