झरी तालुका पत्रकार संघटना कार्यकारिणी अविरोध

10 Feb 2024 20:07:05
- अध्यक्षपदी संजय निंदेकर : उपाध्यक्षपदी बंडू सोयाम

झरीजामणी, 
Zari Taluka Journalists Association : तालुक्यातील पाटण येथील विश्रामगृहात झालेल्या सभेत पत्रकार संघटनेची पुढीलप्रमाणे नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. अध्यक्ष : संजय निंदेकर, उपाध्यक्ष : बंडू सोयाम, सचिव : ज्ञानेश्वर आवार, सचिव : रमेश अंगलवार, प्रसिद्धी प्रमुख : रफीक कनोजे. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पत्रकार नागेश अक्केवार यांच्या अध्यक्षतेत ही सभा घेण्यात आली.
 
 
Zari patrakar
 
Zari Taluka Journalists Association : यावेळी प्रक्रियेदरम्यान तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी सर्व पत्रकार सक्षमपणे कार्य करतील, अशी ग्वाही यावेळी नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी दिली. या सभेला सदस्य संजय आकीनवार, विठ्ठल पाइलवार, नीलेश भोयर, अनिल कुंटावार, विजय मेंगनवार हे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0