अवकाळी पावसासह गारपीट

- शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान - मेघगर्जनेसह लिंबाच्या आकाराची गार, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

    दिनांक :10-Feb-2024
Total Views |
पुलगाव ,
Wardha garpit : देवळी तालुक्यातील इंझाळा यासह विविध गावांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व जोरदार गारपीटीने हजेरी लावली जवळपास १५ ते २० मिनिट बोर ते लिंबाच्या स्वरूपाची गार झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावण्याच्या मार्गावर आहे.
 
  
gapit
 
 
 
सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास इंझाळा, घोडेगाव, कोळोना, तळणी, विजयगोपाल, चोंडी,सोनोरा यासह देवळी तालुक्यातील वेगवेगळ्या भागात गारपिटीला सुरुवात झाली.शेतातील गहू,चना, भाजीपाला तसेच फळबागेचे अतोनात नुकसान झाले आहे. काही भागात वीज पुरवठा सुद्धा खंडित झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. झाडावर असलेला कापूस ओलाचिंब झाला असून शेतकऱ्याच्या डोळ्यात या झालेल्या नुकसानामुळे पाणी आले आहे. सरकारकडून मदतीची आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.