नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे लता मंगेशकर उद्यानात प्रथमच आयोजित ‘पुष्पोत्सवा’चे उद्घाटन आ. कृष्णा खोपडे यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्तडॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते झाले. करण्यात आले. निरनिराळ्या प्रकारच्या पुष्परचना, आकर्षक कलाकृती एकाच ठिकाणी 14 फेब्रुवारीपर्यंत पहाता येणार आहे. नागरिकांनी Pushpotsav' exhibition पुष्पोत्सव प्रदर्शनाला भेट द्यावी व प्रदर्शनाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आ. कृष्णा खोपडे यांनी यावेळी केले.
मनपाच्या अतिरिक्तआयुक्तआंचल गोयल, उपायुक्तरवींद्र भेलावे, सहायक आयुक्तगणेश राठोड, डॉ. अनुश्री अभिजित चौधरी, उद्यान अधीक्षक अमोल चौरपागर, कार्यकारी अभियंता संजय गुजर, विनोद डोंगरे, माजी नगरसेवक प्रदीप पोहाणे, कांता रारोकर, चेतना टांक, अनिता वानखेडे, बाल्या बोरकर, प्रशांत धर्माधिकारी, श्रीकांत देशपांडे, अंबरीश घटाटे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. नागरिकांना झेंडू, पिटोनिया, डायनथस, देहेलिया, गुलाब, जर्बेरा, कॅलेंडुला, प्लँटेला, झिनिया यासारखे शंभराहून अधिक हंगामी व पेरॅनियल फुलांचे प्रकार, विभिन्न प्रजातींची फुले, औषधी वनस्पती या प्रदर्शनात असून सविस्तर माहिती तज्ज्ञांमार्फत नागरिकांना दिली जात आहे.
Pushpotsav' exhibition : पुष्पोत्सवासाठी उद्यानाला सजविण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचे तैलचित्र तसेच सुंदर रांगोळी काढण्यात आली आहे. मुख्य द्वारावर आकर्षक सतार ठेवण्यात आली आहे. उद्यानाच्या मध्यभागी लक्षवेधी बासरी व त्यावर विराजमान कोकिळा अशी प्रतिकृती आहे. फुलांनी सजलेली रेल्वे गाडी ही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. पक्ष्यांसाठी पाण्याची सोय येथे करण्यात आली आहे. उद्यानाच्या दोन्ही दिशेस मचाण फुलांनी आकर्षकरित्या सजविण्यात आले आहे.