साप्ताहिक राशिभविष्य

    दिनांक :11-Feb-2024
Total Views |
साप्ताहिक राशिभविष्य 
 
saptahik
 
 
मेष (Aries) : कुटुंबात मंगलकार्य ठरावे
Weekly Horoscope  : आपल्या राशीत सध्या शुभंकर गुरूचे बस्तान आहे. त्यामुळे या राशीच्या मंडळींना सध्याचा काळ कौटुंबिक सुख, समाधान आणि सौहार्द्राच्या दृष्टीने उपयुक्त आहे. आपले पद, अधिकार व महत्त्व वाढेल. आपले विचार अंमलात येतील. कुटुंबात मंगलकार्ये, विवाहादी कार्यक्रम, धार्मिक सोहळे आयोजित केले जाऊ शकतात. यामुळे घरात पाहुणे, नातेवाईकांची वर्दळ राहील. भागीदारीच्या व्यवसायात असणार्‍यांना या आठवड्यात चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. काहींना कामानिमित्त प्रवास संभवतो. विद्यार्थ्यांना उत्तम काळ.
शुभ दिनांक - 11, 12, 13, 16.
 
 
वृषभ (Taurus) : आर्थिक स्थिती वधारेल
आपला राशिस्वामी शुक्रावर सध्या शुभ गुरूची दृष्टी असून त्यांच्यात लाभ योग झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात आपली आवक उत्तम राहील. आर्थिक आघाडीवर बाजू भक्कम राहील, तथापि, आपणास खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच अन्य ग्रहयोगांमुळे काही घटना अचानक किंवा फारच अल्प कालावधीत घडून आपणास सुखद धक्का देऊ शकतील. विशेषतः युवा वर्गाला नोकरी-व्यवसाय-विवाह अशा भाग्योदयकारक घटनांचे योग यावेत. नोकरी, शिक्षण किंवा पर्यटनासाठीदेखील विदेशात जायचे स्वप्न पुरे व्हावयास हवे.
शुभ दिनांक - 14, 15, 16, 17.
 
 
मिथुन (Gemini) : प्रयत्नांची शिकस्त करावी
Weekly Horoscope : आपला राशिस्वामी बुध अष्टम या अनिष्ट स्थानात व्यथित आहे. शिवाय तो शत्रूंच्या गराड्यात सापडला आहे. यामुळे आपणास हा आठवडा संमिश्र जाऊ शकतो. आपल्याला अतिशय जोमाने, प्रयत्नांची शिकस्त करून महत्त्वाची कामे पूर्णत्वास न्यावी लागतील. कोणतेही नवे उपक्रम या काळात सुरू करू नका. गरज नसेल तर काही विषयांना हात घालूच नका. भागीदारीच्या व्यवहारात असाल तर काहीसे मिळते-जुळते घेणेच फायद्याचे ठरेल. सध्या काहींना प्रकृतीच्या तक्रारी निर्माण असू शकतात. अचानक व मोठ्या खर्चाचे संकट उभे राहण्याचेही संकेत आहेत. त्यामुळे सतर्कता आवश्यक आहे.
शुभ दिनांक - 11, 12, 16, 17.
 
 
कर्क (Cancer) : संमिश्र घटनाक्रम संभव
आपला राशिस्वामी चंद्राचे या आठवड्याच्या प्रारंभी सुरू होणारे भ्रमण आपणास उपयोगी ठरणारे आहे. मात्र, अन्य काही योगांमुळे हा आठवडा बराच संमिश्र घटनांनी युक्त राहील. काही अनपेक्षित घटनांचा आघातही काहींना सहन करावा लागू शकतो. काहींना भ्रमित झाल्यासारखे, काही सुचेनासे होऊ शकते. आप्तेष्टांसोबत मतभेद, वादविवाद संभवतात. नोकरी, व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहावे. कुटुंबात मन रमविण्याचा प्रयत्न करावा. काही नातेवाईक, पाहुण्यांच्या आगमनाने कुटुंबातील वातावरणात सुलभता निर्माण होऊ शकेल.
शुभ दिनांक - 12, 13, 14, 15.
 
 
सिंह (Leo) : नवे प्रस्ताव फायद्याचे
Weekly Horoscope :  राशिस्वामी रवी षष्ठात असून तो या आठवड्याच्या पूर्वार्धातच राश्यंतर करून सप्तमात जाईल. यानंतर त्याच्या शुभ प्रभावाने मानसिक व आर्थिकदृष्ट्या हा आठवडा आपणास उत्तम जावा. एखादेवेळी काहींना या सप्ताहाची सुरुवात खर्चिक व त्रासदायक ठरू शकते, मात्र, नंतर तो उत्तम राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात काही चांगल्या बातम्या कळतील. मुलाबाळांची प्रगती होईल. युवा वर्गास नोकरी-व्यवसाय, परीक्षेत यश मिळेल. विशेषतः व्यावसायिक वर्गाला उत्तरार्ध आर्थिक प्रगती करणारा ठरेल. नवे प्रस्ताव फायद्याचे ठरतील.
शुभ दिनांक - 12, 13, 14, 15.
 
 
 
कन्या (Virgo) : मेहनत करावी लागणार
आपला राशिस्वामी बुध पंचम स्थानात असून गुरूच्या शुभ द़ृष्टीने पुलकित आहे. या ग्रहस्थितीमुळे हा आठवडा बव्हंशी चांगला जाणार असला, तरी तो मेहनत करावयास लावणारा राहील. यामुळे अपेक्षित कामे चांगल्याप्रकारे पूर्ण करता येऊन आपल्याला उत्तम यश जरूर मिळेल. आर्थिक चिंता राहणार नाही. युवा वर्गाला नोकरी-व्यवसायात उपयुक्त संधी चालून येऊ शकतील. काहींना मात्र अचानक एखादा मोठा खर्च उचलावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षेतील उत्तम यशासाठी मेहनत करावी लागणार आहे.
शुभ दिनांक - 14, 15, 16, 17.
 
 
 
तूळ (Libra) : कार्यक्षेत्रात प्रगतीचे वारे
Weekly Horoscope :  या सप्ताहारंभी आपला राशिस्वामी शुक्र लाभ योगात असून शुभंकर गुरूच्याही शुभयोगात आहे. त्यामुळे हा आठवडा आपणास प्रामुख्याने कार्यक्षेत्रात प्रगतिहकारक ठरावा. विशेषतः युवा वर्गास नोकरीच्या व व्यवसायाच्या उत्तम संधी चालून येऊ शकतील. नोकरीत बदल किंवा व्यवसाय विस्ताराचा विचार करणार्‍यांना योग्य दिशेने पावले उचलता येऊ शकतील. काही मंडळींना या आठवड्याच्या उत्तरार्धात एखादे वेळी मोठा खर्च करावा लागू शकतो. युवांना विवाहादी योग संभवतात. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी उत्तम काळ आहे.
शुभ दिनांक - 12, 13, 16, 17.
 
 
 
वृश्चिक (Scorpio) : आर्थिक प्रगतीचे योग
आपला राशिस्वामी मंगळ सध्या आपल्या राशीशी लाभयोग करीत असून तो सध्या उच्च राशीत असल्याने अतिशय बलवान स्थितीत आहे. त्यामुळे विशेषतः युवांना जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांची सुरुवात करणारा हा आठवडा ठरू शकणार आहे. काही युवकांना व्यावसायिक व आर्थिक प्रगतीचे योग यावेत. सप्ताहाच्या मधल्या टप्प्यापासून काही चांगला घटनाक्रम सुरू होऊ शकेल. नोकरी, व्यवसायासाठीच्या घटना वेग घेऊ शकतात. प्रवासाच्या योजना आखता येतील. काहींना नोकरीत बदल करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशासाठी उपयुक्त काळ आहे.
शुभ दिनांक - 11, 12, 16, 17
 
 
धनु (Sagittarius) : प्रलंबित कामांना वेग
Weekly Horoscope :  आपला राशिस्वामी गुरू सध्या शुभस्थानात असून राशिस्थानात शुक्र आहे. या आठवड्यासारखे योग बर्‍याच काळानंतर आपणास लाभले आहेत. त्यामुळे सध्या आपली रास अतिशय बलवान व सर्वोत्तम मानायला हरकत नाही. आपली प्रलंबित कामे आता वेग घेतील. नोकरी-व्यवसायात चांगले योग यावेत. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍यांना बदल करता येऊ शकेल. युवा वर्गास चांगल्या संधी मिळतील. विवाहेच्छु युवा वर्गास हा काळ उत्तम ठरावा. मोठ्या खरेदीच्या संदर्भात हालचाली घडाव्यात. काहींना प्रवास, स्थानांतरण अनुभवावे लागू शकतात.
शुभ दिनांक - 11, 12, 13, 16.
 
 
 
मकर (Capricorn) : आर्थिक शुभत्वाचे संकेत
आपल्या राशिस्थानी सध्या रवी, बुध, मंगळ यांची बैठक जमली असून राशिस्वामी शनी धनस्थानात बलवान आहे. यामुळे या सप्ताहात आपल्याला धनाशी संबंधित सर्वप्रकारचे शुभत्व अनुभव करण्याची संधी येऊ शकणार आहे. या ग्रहस्थितीमुळे आपल्या योजनांना उत्तम बळ मिळून त्याची पुरेपूर फले प्राप्त होऊ शकतील. या संधीचा लाभ घेऊन आपल्या कामांचे उधळून देण्याचा प्रयत्न करू शकता.उत्तम प्रसिद्धी मिळेल. विदेशात जाण्याच्या योजनांना गती मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादी शुभ वार्तादेखील कळावी.
शुभ दिनांक - 14, 15, 16, 17.
 
 
 
कुंभ (Aquarius) : आरोग्याची काळजी घ्या
Weekly Horoscope :  आपला राशिस्वामी शनी सध्या राशिस्थानातच अतिशय बलवान स्थितीत आहे. त्यामुळे आपल्यासाठी अतिशय उत्तम व उपयोगी ठरणारा हा काळ आहे. शनी नोकरी-व्यवसायासाठी फारच उपयोगी आहे. तथापि, शनीभोवती जमलेल्या काही विरोधी ग्रहांच्या प्रभावामुळे काहींना संमिश्र परिणामही मिळू शकतात. आरोग्याच्या जुन्या तक्रारी असल्यास त्या वाढणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबात तक्रारीचे सूर उमटू शकतात. आर्थिक बाजू प्रभावित होणार नसली, तरी सतर्क राहणे आवश्यक आहे.
शुभ दिनांक - 11, 12, 16, 17.
 
 
 
मीन (Pisces) : कार्यक्षेत्रात यशदायी काळ
Weekly Horoscope :  राशिस्वामी गुरूचे धनस्थानातून सध्या सुरू असलेले भ्रमण आपल्यासाठी उत्तम ठरणारे आहे. अशात या आठवड्यातील अन्य काही ग्रहयोगांची मदतच मिळणार आहे. ही स्थिती आपणास कार्यक्षेत्रातील यशासाठी फलदायी ठरणार आहे. विशेषतः व्यावसायिक कामात उत्तम यश मिळू शकेल. नोकरीतही समाधानाचे वातावरण राहील. काही आकस्मित लाभाचे प्रसंग उद्भवू शकतात. कुटुंबात काही चांगले व मंगलमय प्रसंग साजरे व्हावेत. विवाहोत्सुक युवा वर्गास चांंगले योग यावेत. आर्थिक बाजू समाधानकारक राहील. हवामानातील बदलामुळे काहींना प्रकृतीची कुरबूर जाणवेल.
शुभ दिनांक - 11, 12, 14, 16.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746