राजरत्न पुरस्काराची घोषणा -२०२४

    दिनांक :12-Feb-2024
Total Views |
नागपूर,
Raja Ratna Award श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मारक प्रतिष्ठान आणि नागपूर ट्रस्ट महाराज च्यावतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींना “राजरत्न पुरस्कार” प्रदान केला जाणार आहे. १४फेब्रुवारी २०२४ रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.  प्रतिष्ठानने ठरवून दिलेल्या मानकांच्या आधारे, ६ व्यक्ती आणि १८वर्षांखालील२ मुलांची निवड समितीने केली आहे.राजरत्न पुरस्कार वितरण सोहळा बुधवार१४ फेब्रुवारी २०२४ रोजी, सायंकाळी ५.३० वा. सिनियर भोंसला पॅलेस, महाल, येथे संपन्न होणार आहे.
 
nag
 
 श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम) स्मृती पुरस्कार संदीप पवार (मठ. पळशी, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांना
साहित्य आणि इतिहास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्रीमंत राजे मुधोजी महाराज उर्फ ​​अप्पासाहेब भोंसले (द्वितीय) स्मृती पुरस्कार ओमप्रकाश शिव यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीमंत राजेबहादूर रघुजी महाराज भोंसले (चतुर्थ) स्मृती पुरस्कार ओजस देवतळे Raja Ratna Award यांना संगीत आणि गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी श्रीमंत जैन यांना छायाचित्रकार म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्रीमंत राजेबहादूर फत्तेसिंग महाराज भोंसले स्मृती पुरस्कार. अनंतमुळे यांना विशेष कार्याबद्दल श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले ऊर्फ चिमणाबापू स्मृती पुरस्कार,संजय भाकरे यांना श्रीमंत राजेबहादूर अजितसिंह महाराज भोसले स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सौजन्य: देवराव प्रधान,संपर्क मित्र