मध्यरात्री घराला आग लागून 30 क्विंटल कापूस खाक

(सुदैवाने वाचले कुटुंब, नरसिंहापल्ली येथील घटना)

    दिनांक :12-Feb-2024
Total Views |
सिरोंचा, 
House fire : तालुक्यातील रेगुंठा परिसरातील नरसिंहापल्ली येथे 10 फेब्रुवारी रोजी शनिवारला मध्यरात्री आग लागल्याने घरासह घरातील 30 क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने झोपडीत राहणार्‍या कुटूंबातील व्यक्ती सुखरूप बचावले आहेत.
 
 
444
 
नरसिंहापल्ली येथील रवींद्र शंकर चेन्नुरी हे नेहमीप्रमाणे रात्री जेवन करून आपल्या कुटुंबियांसमवेत झोपले असतांना मध्यरात्री अचानक घराला आग लागली. या आगीत घरात वेचनी करून ठेवलेला 30 क्विंटल कापूस जळून खाक झाला. घरातील संसारोपयोगी साहित्य देखील आगीच्या भक्षस्थानी सापडले. या आगीत एकंदरीत 5 लाख रूपयांचे चेन्नुरी यांचे नुकसान झाले. सदर घटनेची माहिती मिळताच सिरोंचाचे तहसीलदार जितेद्र शिकतोडे यंनी घटनास्थळी मंडळ अधिकारी धात्रक व तलाठी पोरतेट यांना पाठविले. मंडळ अधिकार्‍यांनी पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्‍वासन यावेळी दिले.