अशांतिदूतांचे थैमान

    दिनांक :12-Feb-2024
Total Views |
कानोसा
- अमोल पुसदकर
उत्तराखंड येथील haldwani_violence हल्दवानी या ठिकाणी एका अवैध मदरशाचे बांधकाम तोडायला गेलेल्या सरकारी लोकांवर मुस्लिम समाजातील उपद्रवी लोकांनी नुकताच हल्ला चढविला. यामध्ये अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. एवढ्यावरच हे उपद्रवी थांबले नाहीत तर यांनी आजूबाजूच्या दुकानांना आगी लावणे, लोकांच्या गाड्यांची तोडफोड करणे, आग लावणे आणि एवढे पुरेसे नव्हते म्हणून की काय एका घरामध्ये आसरा घेतलेल्या 15-20 पोलिस कर्मचार्‍यांना पाहून त्या संपूर्ण घरालाच पेटवून देण्याचा प्रयत्न करणे अशा पद्धतीचे काम केलेले आहे. यावरून आपल्या लक्षात येते की, यांची मानसिकताच उपद्रवी आहे. तुम्हाला जर मदरसा बांधायचा आहे तर मग पैसे जमा करा, जागा घ्या आणि दोन मजली कशाला दहा मजली बांधा. परंतु सरकारी जागेवर अतिक्रमण करणे आणि तेथे अवैध निर्माण करणे व हे निर्माण तोडायला आलेल्या सरकारी लोकांवर हल्ला चढविणे हे सर्व देशविघातक कृत्य आहे. आता सरकारच्या लक्षात येत आहे की, सरकारी लोकांवर हल्ला करणारे हे हल्लेखोर आधीपासूनच तयारीत होते, सुसज्ज होते. पेट्रोल बॉम्ब, घरांची, गाड्यांची जाळपोळ करायला आवश्यक असलेले ज्वलनशील पदार्थ, दगड या सर्वांचा साठा त्यांनी आधीपासूनच करून ठेवलेला होता.
 
 
haldwani_violence
 
आता सरकार व प्रशासन यांनी पण सुधारण्याची आवश्यकता आहे. या आधी याच haldwani_violence  हल्दवानीमध्ये रेल्वे लाईनच्या लगत असलेल्या 29 एकर जागेवर अतिक्रमण करून तेथे राहणार्‍या हजारो लोकांनी प्रशासनाचा विरोध केला होता. आपल्याकडे समस्या ही आहे की, माझ्या व्यक्तिगत एक फूट जागेवर जरी कोणी अतिक्रमण केले तरी मी सर्व कामधंदे बाजूला सोडून त्या एक फूट जागेकरिता लढा उभारतो व ते अतिक्रमण दूर करण्याचा प्रयत्न करतो; परंतु सरकारी जमीन ही कोणाची आहे? सरकारची आहे. सरकारी म्हणजे ज्याचा कोणी वारिस नाही अशी. त्यामुळे अशा जमिनीवर काही विशिष्ट धर्माचे लोक, जातींचे लोक हे अतिक्रमण करतात व झुंडशाहीच्या आधारावर अतिक्रमणविरोधी यंत्रणेला विरोध करतात. या झुंडशाहीला मोडून काढणे आवश्यक आहे. अशा पद्धतीचे संवेदनशील बांधकाम तोडताना ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये काळजी घेतली जाते तशाच पद्धतीची काळजी आता सरकारी यंत्रणांनी देशभरात सर्वत्र जेथे जेथे असे संवेदनशील उपद्रवी लोकांचे वास्तव्य आहे तेथे तेथे घेण्याची आवश्यकता आहे. दुर्गादेवीच्या व गणपतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करणारे हात व अवैध मदरशांना तोडण्याचा विरोध करणारे हात हे एकच आहेत. यांची मानसिकता एक आहे हे ओळखले पाहिजे. 1947 पासून आतापर्यंत या समाजाच्या उपद्रवी मानसिकतेबद्दल आम्ही कधीच शहाणे झालेलो नाही, असेच लक्षात येते आहे व याचा दंड निरपराध नागरिकांना स्वतःची मालमत्ता व प्राण याचे मूल्य देऊन चुकवावे लागते हे सगळेच निंदनीय आहे.
 
 
 
haldwani_violence : काश्मीरमध्ये मुसलमानांवर अत्याचार होतात, असा कांगावा पाकिस्तान नेहमीच करत असतो. परंतु चीनमध्ये मुसलमानांवर अत्याचार होतात, त्यांना नजरकैदेत ठेवले जाते, प्रशिक्षणाच्या नावाखाली हजारो मुसलमानांना बंदिस्त केले जाते, त्यांचे जबरदस्तीने ब्रेन वॉशिंग केले जाते. त्यावेळेस पाकिस्तानला दुःख होत नाही. भारतातील मुस्लिम नेतृत्वाला, फतवे काढणार्‍या मौलवींना, ज्यांना भारतामध्ये असुरक्षित वाटते त्यांनासुद्धा याचे काहीही वाटत नाही. चीनमधील शिनजियांग प्रांतामध्ये तेथील सरकारने मशीद तोडली तर पाकिस्तान असो किंवा अरब राष्ट्र किंवा इतर कुठलेही मुस्लिम राष्ट्र त्यांना दुःख होत नाही व ते यावर काही बोलत नाही. मशिदींच्या बांधकामांमध्ये इस्लामी नव्हे तर चिनी झलक असावी, असे चीनचे म्हणणे आहे. परंतु भारतामध्ये जर अशा पद्धतीची एखादी घटना घडली तर मात्र भारतामध्ये अल्पसंख्यक असुरक्षित आहेत, त्यांचे धार्मिक अधिकार असुरक्षित आहेत, मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे अशा पद्धतीचा देखावा आणि कांगावा केला जातो.
 
 
आमचे राहुल गांधी अमेरिकेतल्या कार्यक्रमात जाऊन भारतामध्ये मुस्लिम कसे असुरक्षित आहेत, त्यांचे धार्मिक अधिकार कसे नाकारण्यात येतात अशा पद्धतीचा देखावा निर्माण करीत असतात. परंतु वस्तुस्थिती काय आहे? हल्दवानीमध्ये एकटा मदरसा हटविला गेला नाही तर त्या परिसरात असणारे तसेच शहराच्या इतरही भागांमध्ये असणारे जे अतिक्रमण आहे ते हटविण्याचे काम चालू होते. याच्या संदर्भातल्या लेखी सूचना सर्वांना आधीच पाठविल्या गेलेल्या होत्या. ज्या वेळेस मदरशाला अशा पद्धतीची लेखी सूचना देण्यात आली त्यावेळेस तेथे दगडांचा साठा नव्हता. इतके लोक नव्हते. परंतु अतिक्रमण काढण्याच्या दिवशी मात्र आजूबाजूच्या घरांवरून मोठमोठाले दगड पोलिसांवर व कर्मचार्‍यांवर फेकण्यात येऊ लागले. यावरून अतिक्रमणाचा विरोध हा एक बहाणा आहे. परंतु मुख्य उद्देश हिंसा पसरविणे, हिंदू समाजाला व त्यांच्या मालमत्तांना धोका पोहोचविणे हाच होता. नूपुर शर्मा यांनी प्रेषितांबद्दल केलेल्या टिप्पणीची सर्व मुस्लिम जगताने दखल घेतली होती. नूपुर शर्माची प्रतिक्रिया ही व्यक्तिगत होती. ती भारत सरकारची प्रतिक्रिया नव्हती. तरीही भारतीय बनावटीच्या वस्तू कुवेतने आपल्या दुकानांमधून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. परंतु हेच धाडस कुवेत किंवा इतर मुस्लिम राष्ट्र चीनबद्दल दाखवत नाही.
 
 
haldwani_violence : 2014 मध्ये या देशांमध्ये मोदींच्या नेतृत्वात जे सरकार आलेले आहे त्यामुळे देशाचा मान विदेशामध्ये वाढलेला आहे. ज्या अरब देशांमध्ये हिंदूंना खुलेआमपणे आपली पूजा पद्धती अमलात आणता येत नव्हती त्या अबुधाबीमध्ये आज भव्य मंदिर उभे राहिलेले आहे. हा भारताच्या शक्तीचा चमत्कार आहे. त्यामुळे जगातील मुसलमान राष्ट्र जर चीनच्या शक्तीसमोर नतमस्तक होऊ शकतात तर ते भारताच्या शक्तीसमोरसुद्धा नतमस्तक होतील. आमच्या देशामध्ये दंगली घडविणारे जे दंगेखोर आहेत त्यांचे बाप असलेले हे मुस्लिम राष्ट्र जर आमच्या समोर नतमस्तक झाले तर या दंगेखोरांचे आपोआपच शमन होईल. उत्तराखंडमध्ये नुकत्याच पारित करण्यात आलेल्या समान नागरी कायद्याला हल्दवानी हिंसा हे प्रत्युत्तर असू शकते. येणार्‍या काळामध्ये भारताला मजबूत सरकार व मजबूत समाज या दोघांचीही अशा उपद्रवी अशांतिदूतांचा बीमोड करण्यासाठी आवश्यकता आहे. 
 
- 9552535813
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)