पारवेकर महाविद्यालयात जिल्हास्तर वादविवाद स्पर्धा

13 Feb 2024 16:58:43
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Debate Competition : आबासाहेब पारवेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक‘म नियमितपणे आयोजित केले जातात. ही परंपरा पुढे नेत 8 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात जिल्हास्तर हिंदी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
Debate Competition
 
 
‘सोशल मीडिया आणि तरुण पिढी, तोटा की फायदा’ ही या स्पर्धेची थीम होती. या स्पर्धेत रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र व करंडक बक्षीस म्हणून देण्यात आले. या स्पर्धेत परीक्षक म्हणून डॉ. संतोष गाजले यांच्यासह डॉ. संजय तामगाडगे होते. अध्यक्षस्थानी पारवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय नावलेकर होते. या कार्यक‘माचे आयोजन व नियोजन पारवेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दिनेश जयस्वाल यांनी केले.
 
या जिल्हास्तर वादविवाद स्पर्धेत यवतमाळच्या पारवेकर महाविद्यालयासह बापूजी अणे महिला महाविद्यालय, जाजू महाविद्यालय, विद्याभारती महाविद्यालय, महात्मा फुले समाज कल्याण महाविद्यालय, वाधवानी महाविद्यालय अशा अनेक महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींनी भाग घेतला.
 
या वादविवाद स्पर्धेची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. सर्वप्रथम परीक्षक डॉ. संतोष गजले यांनी वादविवाद स्पर्धेचे महत्त्व व स्वरूप सांगितले, त्यानंतर या स्पर्धेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उदय नावलेकर यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेचे नियम समजावून सांगून आत्मविश्वासाने बोलण्याची प्रेरणा दिली. या स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ. दिनेश जयस्वाल यांनी केले.
 
या स्पर्धेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाशी संबंधित आपल्या कल्पना अतिशय तर्कशुद्ध आणि आकर्षक पद्धतीने मांडल्या. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक अणे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आरू रवींद्र राठोड यांना मिळाले. हिला डॉ. दिनेश जयस्वाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र, चषकासह 1 हाजर रुपये रोख बक्षीस देण्यात आले.
 
द्वितीय पारितोषिकप्राप्त पारवेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी नेहा मडावी हिला प्रमाणपत्र व डॉ. गजानन रहाटे यांच्याकडून 700 रुपये रोख देऊन गौरविण्यात आले. तृतीय पारितोषिक अणे महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कल्याणी खडसे हिला 500 रुपये रोख व प्रमाणपत्र डॉ. मनीष वाडीवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आभार डॉ. संजय तामगाडगे यांनी मानले. तर आदित्य नवग‘हे यांनी तांत्रिक सहकार्याचे महत्त्वपूर्ण काम केले.
Powered By Sangraha 9.0