नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला 35 हजार पर्यटकांची भेट

13 Feb 2024 18:09:37
गोंदिया, 
Navegaon-Nagzira Tiger Reserve : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प नैसर्गिक सौंदर्य, वन्य प्राणी व विविध वनसंपदेने नटलेला आहे. या प्रकल्पाला. देश विदेशातील पर्यटक भेट देतात. गत काळात प्रकल्पात विविध सुविध उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचीच परिणीती म्हणून वर्षभरात 35 हजार पर्यटाकांनी प्रकल्पाला भेट दिली असून या माध्यमातून वन विभागाला 96 लाख 41 हजार रुपयाचा राजस्व प्राप्त झाल्याचे प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जयराम गौडा आर. यांनी सांगीतले.
 
 
 
SZDRTG
 
जंगल सफारीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, येथील जलसंस्थांमध्ये पर्यटकांसाठी हाऊस व सोलर बोट आदींसह जलपर्यटनाच्या विविध सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याने या प्रकल्पाकडे पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षित होतील. यातूनच प्रकल्पाच्या राजस्वात भर पडेल. असा विश्वास व्यक्त करीत वरील उपाय योजना करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आभासी प्रणालीद्वारे पार पडलेल्या बैठकीत यंत्रणेला दिल्या. प्रकल्पात सफारीसाठी 135 वाहनांची संख्या मंजूर असताना आज स्थितीत केवळ 45 जिप्सी कार्यरत आहेत. उर्वरित वाहने तातडीने पर्यटन सेवेत उपलब्ध करण्याचे व त्यात इलेक्ट्रिकल वाहनांचा प्राधान्याने समावेश करण्याच्या सूचनाही बिदरी यांनी दिल्या.
 
शालेय विद्यार्थ्यांना अल्पदरात जंगल सफारीसाठी दोन बसेस सुरू करण्याचेही त्यांनी सूचित केले. व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव, पक्षी तसेच वृक्षांबद्दलची माहितीबाबत गाईड्संना विशेष प्रशिक्षण देवून त्यांची गुणवत्ता वाढ करणे, विदेशी पर्यटकांच्या दृष्टीने इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण देणे, प्रकल्पाच्या क्षेत्राजवळील हॉटेल्स, रिसॉर्ट्समध्ये 50 टक्के हरितऊर्जेचा वापर बंधनकारक करण्याचे तसेच ध्वनीप्रदुषण व विद्युत दिव्यांची प्रखर रोषणाई आढल्यास संबंधितांवर कठोर करणे, विदेशी पर्यटकांचे प्रवेश शुल्क, व्यावसायीक पर्यटन शुल्कामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिने प्रस्ताव सादर करणे, प्रकल्प परिसरात प्लॅस्टिकचा वापर पुर्णत: बंद करून पिण्याचे पाणी काचेच्या किंवा स्टीलच्या बाटलीत पर्यटकांना उपलब्ध करून देत प्रकल्प क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्राधाण्याने उपलब्ध कराव्यात. पर्यटन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, पर्यटन विकासाचा व प्रसिद्धीचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही बिदरी यांनी दिल्या. यावेळी समिती सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. बैठकीला भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जयराम गौडा, उपायुक्त चंद्रभान पराते, गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई, विभागाचे राहूल गवई यांच्यासह समितीचे पदाधिकारी तथा मानद वन्यजीव संरक्षक मुकूंद धुर्वे, सावन बहेकार, नदिम खान, शाहीद खान उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0