रेड्यांची टक्कर पाहण्यासाठी हजारोंची गर्दी

-दोन राज्यातील 250 रेड्यांचा सहभाग -परंपरेसोबत मनोरंजनाची जोड

    दिनांक :13-Feb-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
धारणी, 
REDYACHI TAKKAR : मेळघाटच्या सीमेवर असलेल्या मध्यप्रदेशातील खकनार जवळच्या शनिमंदिर परिसरात मोती अमावस्येला सालाबादाप्रमाणे रेड्यांची टक्कर आयोजित करण्यात आली. यावेळी विक्रमी म्हणजे लाखाच्या घरात दर्शक उपस्थित होते. प्रथम पुरस्कार मध्यप्रदेशातील डोईफोडी येथील रेड्याने तर द्वितीय पुरस्कार परतवाडा येथील रेड्याने जिंकला.
 
 
SETF SAEG
 
 
धारणीपासून 35 किमी तर तालुक्यातील बारातांडा सीमेपासून 8 किमी अंतरावरील खकनारजवळ शनिदेवाची दोन दिवसाची यात्रा भरली होती. परंपरेनुसार येथे रेड्यांच्या टक्करचे आयोजन करण्यात आले व यावेळी विक्रमी व ऐतिहासिक ठरले. महाराष्ट्रातील परतवाडा, अचलपूर, नांदेड, जळगावसह मध्यप्रदेशातील एकूण 250 रेड्यांनी टकरीत भाग घेतला. सुकी नदीजवळ करदली मैदानावर हजारो दर्शकांनी या पारम्परिक खेळाचा मनसोक्त आनंद लुटला. काही वर्षापूर्वी टक्कर लढतांना रेडे प्रेक्षकांच्या गर्दीत प्रवेश करून गेल्याने भगदड होऊन अनेक लोक जखमी झालेले होते. हा अनुभव लक्षात घेऊन आयोजकांनी लोखंडी काटेरी कुंपण घातलेले होते. परिणामी कोणतीच अनुचित घटना घडली नाही.
 
अपेक्षेपेक्षा जास्त प्रेक्षक पोहचल्याने धारणी-बर्‍हाणपूर महामार्गाजवळ दोन वाहतूक ठप्प झाली होती. प्रथम पुरस्कार जवळच्या डोईफोडीच्या शमसुने यांनी जिंकला तर द्वितीय परतवाडाच्या शाबीर यांच्या रेड्याने आणि तृतीय अचलपूर येथील निखिल यांच्या रेड्याने जिंकला. चौथा किशोर आणि पाचवा खकनार येथील रेड्याने जिंकला. यात्रा आणि रेड्यांची टक्कर पाहण्यासाठी चिक्कार गर्दी होती. धारणी तालुक्यातून मध्यप्रदेशच्या खकनार तालुक्यात जाणारी सुकी नदी सध्या कोरडी पडलेली असून तिच्या पात्राला स्टेडियमचे स्वरुप आलेले होते.