नागपूर,
Sahitya Vihar साहित्य विहार संस्था आपल्या आजीवन सदस्यांचा अभिष्टचिंतन पर कार्यक्रम घेत असते या कार्यक्रमांमध्ये संस्थेच्या आजीवन सदस्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. यावेळी ग्रंथ भेट व अभिष्टचिंतन शुभेच्छा प्रमाणपत्र देण्यात येते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भा.श्री.फडनाईक यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व हे आयोजन समर्थपणे, समृद्धपणे राबविणाऱ्या आशाताई पांडे यांनी साहित्य विहार नावाच्या छोट्याश्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले असे ते आपल्या भाषणात म्हणाले.या संस्थेचे कार्यक्रम नेहमीच उत्कृष्ट आणि समाजपयोगी असतात. नवोदितांना ही संस्था नेहमीच पुढे आणण्याचे धोरण राबवत असते. असे, मनोगत अभीष्ट चिंतन सोहळा व त्रैमासिक साहित्य सूजन च्या प्रकाशनाच्या वेळी धनवटे नॅशनल कॉलेजच्या माजी प्रिन्सिपल डॉ. भारती खापेकर यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. माधुरी वाघ यांनी सदस्यांना साहित्य सृजन त्रैमासिका मधे दिन विशेष बघून त्या वर नवीन लिखाण देण्यासाठी व पुढील त्रैमासिका मधे पुस्तक समीक्षण सदर सुरू केले आहे.Sahitya Vihar व त्याकरीता लेखकांना आवाहन केले आहे. सूत्रसंचालन डॉ. तुषार झाडे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप संस्थेच्या अध्यक्ष आशा पांडे यांनी केला. मकर संक्रांती निमित्त तिळगुळाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य:मंदा खंडारे, सौजन्य मित्र