वाशीम,
Gatai workers : शहरातील गटई कामगारांना वाहतुकीस अडथळा न येणार्या ठिकाणी स्टॉल उभारण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी श्री गुरू रविदास विश्व महापीठ ट्रस्ट (भारत) शाखा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन प्रदेशाध्यक्ष लॉ वसंतराव धाडवे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.
नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, शहरातील गोर - गरीब चर्मकार बांधव रस्त्याच्या कडेला जेथे वाहतुकीस अडथळा होत नाही, अशा ठिकाणी बसून बुट पॉलिश करून आपला उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रातील बर्याच महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये गटई कामगारांना बसण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे वाशीम शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला ज्या ठिकाणी वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी चर्मकार बांधवांन स्टॉल उभारण्यास परवानगी देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देताना महापीठचे प्रदेशाध्यक्ष लॉ. वसंतराव धाडवे, जिल्हाध्यक्ष विजय धुमाळे, तालुकाध्यक्ष नारायण करंगे, गटई कामगार अध्यक्ष मधुकर घोले, गोपीचंद खंडारे, सखाराम सरदार, गोपाल चर्हाटे, बबन बांगरे, गोपाल राठी, देविदास सरदार, ज्ञानेश्वर घोले, गणेश इंगळे, धनराज राठी, सुरेश राठी, राजू घोले, इश्वर खंडारे, अशोक पिंपळे, प्रकाश चंदेरे, राजेश पहारे, सुखदेव शेगोकार, गजानन शेवाळे, तुळशीराम इंगळे, रामेश्वर चर्हाटे आदीं चर्मकार बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.