- मानधनात वाढ करण्याची मागणी
यवतमाळ,
आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन Striparichar Sanghatan स्त्री-परिचर संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने अंशकालीन स्त्री-परिचरांना दरमहा रुपये 26000 मानधन, वेतन द्या व आरोग्य खात्यात कायम करा, या मुख्य मागणीसह जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयावर धरणे आंदोलन केले. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना निवेदन पाठविण्यात आले.
Striparichar Sanghatan : 20 ऑगस्ट 2014 रोजी आरोग्य संचालकांनी अंशकालीन स्त्री-परिचरांना 10,000 रुपये वेतनवाढ देण्यात यावी, अशी शिफारस केली आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे संघटनेने म्हटले आहे. अलीकडे 6 हजार रुपये मानधन वाढ द्या म्हणून आरोग्य खात्याने प्रस्ताव टाकला आहे. त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागण्या अंशकालीन स्त्री-परिचरांना दरमहा 26000 रुपये मानधन, वेतन द्या, त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम करा, त्यांना पूर्णवेळ कर्मचारी करा, वारसांना सेवेत घ्या, पेन्शन योजना लागू करा, गणवेश व ओळखपत्र तातडीने द्या यासह इतरही मागण्या करण्यात आल्या.
Striparichar Sanghatan : यावेळी दिवाकर नागपुरे, मंगला लंबे, वैशाली निबर्ते, जिजा रीगने, कल्पना सवाईमुन, आशा बोबडे, सोनाली कडुकार, शेवंता पवार, रमा शंभरकर, मीरा वाघमारे, उषा राठोड, बेबी ठाकरे, वंदना माडगूळकर, अनसूया सोनकुसरे, संगीता वायदंडे, सुमित्रा जमदाळे, शशीकला भगत, अर्चना चिकटे, गंगू तोङसाम, सुनीता भस्मे, जयश्री मरापे, पर्वता दाते, वेणू कांबळे, रंजना ढोके, धोंडाबाई आगोशे, सायरा शेख, कविता राठोड, अंजना सरकुंडे प्रामुख्याने हजर होत्या.