बंधार्‍याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे

15 Feb 2024 16:54:36
उंबर्डा बाजार,
embankment work येथून काही अंतरावर असलेल्या हनुमान मंदिर जवळील नाल्यावर शासनाचे लाखो रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारा बांधला जात आहे. बंधार्‍याचे बांधकाम करतांना सबंधित अभियंता व कंत्राटदार यांचा मनमानी कारभारामुळे अंदाजपत्रकाला तिलांजली मिळाली जात आहे. सदर कामा विषयी कोणताही फलक लावला नसल्याने सदर कामाविषयी शंका निर्माण होत आहे.
 

cghhj 
 
उंबर्डा बाजार ते जांब रस्त्यावरील हनुमान मंदिर जवळील नाल्यावर एक कोल्हापूर टाईप सिमेंट क्रॉकिटचा बंधारा बांधण्यात येत आहे. मात्र बंधारा निकृष्ठ दर्जाचा व तांत्रिकदृष्ट्या सदोष पद्धतीने होत नसल्यामुळे सदरचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत आहे. रेती ऐवजी चुरीचा बांधकामात सर्रास वापर होत असल्याने हा बंधारा किती दिवस टिकेल?embankment work असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.विशेष म्हणजे की सदर नव्याने बांधण्यात येत असलेला बंधारा जवळून शंभर मीटर अंतरावर कृषी विभागाचा बंधारा असल्याने त्या जवळच हा बंधारा बांधण्याचे संबधित विभागाला अवगत नाही का तरी बंधार्‍याच्या कामाची गुणनियंत्रण विभागामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Powered By Sangraha 9.0