जिल्ह्यातील कुपोषित बालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अनिल हमदापुरे यांचा पुढाकार

    दिनांक :16-Feb-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
malnourished children मनसेचे यवतमाळ जिल्ह्याचे नेते अनिल हमदापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील कुपोषित बालकांना प्रोटीन पावडर, पोषक आहार आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर काहीतरी सकारात्मक उपाययोजना व्हावी या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जवळपास ४५० कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी झाली. सोबतच त्यांच्या रक्त चाचण्या पण मोफत करण्यात आल्या.
 
 
malnourished children
 
या शिबिराला यवतमाळ येथील बालरोग तज्ञ डॉ. अनिल आखरे, डॉ. ऐश्वर्या प्रधान, डॉ. ममता डोंपले, डॉ. अमित व्यवहारे, डॉ. मयूर पांढरीकर, डॉ. नागेश व्यवहारे, डॉ. प्रिया अनिल हमदापुरे यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व बालकांना औषधीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात आलेल्या बालकांना मोफत किटचे वाटप करण्यात आले. त्यात प्रामुख्याने एक डबा प्रोटीन पावडर, २ बॉटल मल्टिव्हिटॅमिन, शेंगदाणा लाडू पाकीट, पेंड खजूर पाकिट, राजगिरा लाडू पाकिटाचे वाटप करण्यात आले. या शिबिरात अतिदुर्गम भागातील बालकांचीही नोंदणी करण्यात आली. malnourished children येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात शिबिराचे आयोजन करण्याचा मानस या प्रसंगी अनिल हमदापुरे यांनी बोलून दाखवला. विशेष म्हणजे या पूर्वीही विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास ५०० बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया, कॉकलीयर एम्प्लान्ट, बोन म्यारो, पायाची शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, कोरोना काळातील सामाजिक कार्यासह अनेक समाजोपयोगी उपक्रम अविरतपणे सुरू असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली.या सर्व कार्यची प्रेरणा माझे आई-बाबा यांच्याकडून मिळत असल्याचे मत या प्रसंगी अनिल हमदापुरे यांनी व्यक्त केले.
 
 
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ. गंगाथडे, खरतडे, ममता कापसे, रेणुका खोकले, प्रवीण निमकर, प्रवीण दुधे, अर्चना मेश्राम, चांदोरे, मातोश्री नर्सिंग कॉलेजचे तेलगोटे तसेच त्यांच्या महाविद्यालयातील एनएनएम विद्यार्थिनी, या प्रकल्पाचे कार्यक्रम अधिकारी कुणाल पिसोळे, सर्व औषधी वाटपकर्ते, परिचारिका, अंगणवाडी सेविका सीमा क्षीरसागर, राखडे यांनी विशेष सहकार्य दिले. या शिबिराला प्रामुख्याने मनसेचे देवा शिवरामवार, विकास पवार, गजानन पोटे, साजिद अब्दुल रहमान यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमासाठी अंजली पारधे, पिंटू तोरकडी, गौरव दरणे, लकी छांगाणी, दीपक आडे, आक्रोश पवार, सौरभ अनqसगकर, प्राची मिरासे, सुधांशू काळे, सालिक, ओम राठोड, डॉ. सागर गड्डमवार, मयूर कारंजकर, चेतन ठोंबरे, हेमंत जोशी, अनिकेत मीठे, पद्मनाभ जोशी यांनी परिश्रम केले. या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात बालकांचे पालक इतर कार्यकर्ते उपस्थित होते.