शिरपूर येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे आयोजन

२० ते २२ फेब्रुवारी दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन

    दिनांक :17-Feb-2024
Total Views |
शिरपूर जैन,
Vishwakarma Jayanti येथील मुळ देवस्थान श्री विश्वकर्मा प्रभूचा जयंती महोत्सव २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान पार पडत आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे साजरा केला जाणारा मुळ देवस्थान श्री विश्वकर्मा प्रभूचा यात्रा महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी पार पडणार्‍या कार्यक्रमात श्री विश्वकर्मा महापुराण वाचन दररोज सकाळी ७ वाजता वाचक - गजानन तुळशीरामजी मुगवानकर (शिरपूर) यांचेद्वारे होईल. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते ९ श्री विश्वकर्मा प्रभु तथा श्री संत पद्माजी महाराज यांचा अभिषेक अतुल प्रभाकर खंदारकर व विद्या अतुल खंदारकर यांच्या हस्ते होईल.
 

vishwakarma jayanti 
 
त्यांनतर सकाळी ९.३० वाजता धर्म ध्वजारोहण रामदासपंत काटकर अध्यक्ष श्री विश्वकर्मा संस्थान, योगेश सावळकर, अध्यक्ष श्री विश्वकर्मा जयंती उत्सव समिती २०२४ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारी सकाळी ८ ते १० गायत्री महायज्ञ कलश यात्रा होत आहे, कलश यात्रेनंतर श्री गायत्री यज्ञ तथा श्री विश्वकर्मा याग शुभारंभ करण्यात येईल. यज्ञ पुरोहीत पुरुषोत्तम दुरतकर तथा श्री गायत्री परिवार वाशीम यांचेद्वारे गुरूवार २२ फेब्रुवारी सकाळी ७ ते १० यज्ञ हवन व पुर्णाहुती त्यानंतर श्रीची पालखी मिरवणुक गावातून काढण्यात येईल. या कार्यक्रमा नंतर समाजबांधवाचा मेळावा तथा चर्चासत्र घेण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता नंतर महाप्रसाद वाटप होईल. यावर्षी उत्सवातील महाप्रसादाचे अन्नदान जनार्दनपंत झरकर पुसद यांचे कडून होत आहे. तरी सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ समस्त विश्वकर्मीय बांधव, महिला यांनी घ्यावा. असे आवाहान संस्थानचे अध्यक्ष, पदाधिकारी, समस्त ट्रस्टी व महोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश सावळकर तथा इतर पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.