-न्या. भूषण गवई यांचे प्रतिपादन
-पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा सत्कार
नागपूर,
समाजासाठी समर्पित, सामाजिक बांधिलकी असणारी माणसेच खरी एमिनंट पर्सन असतात, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे Bhushan Gavai न्या. भूषण गवई यांनी केले. समाजासाठी सतत वेळ देणारे डॉ. चंद्रशेखर मेश्राम हे या अर्थाने खरे एमिनंट पर्सन आहेत, असेही न्या. गवई म्हणाले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन, अकॅडमी ऑफ मेडिकल सायंसेस यांच्या पुढाकाराने तसेच समस्त डॉक्टरांच्या विविध संघटनांतर्फे रविवारी सत्कार करण्यात आला. आयएमएच्या शॉ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आयएमएच्या अध्यक्ष डॉ. वंदना काटे, सत्कार सोहळ्याचे संयोजक डॉ. रमेश मुंडले, अकॅडमी ऑफ मेडिकल सायंसेसचे अध्यक्ष डॉ. अजय अंबाडे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, त्यांच्या पत्नी नम्रता मेश्राम व्यासपीठावर उपस्थित होत्या.
Bhushan Gavai : न्या. भूषण गवई म्हणाले की, उमरेड तालुक्यातील एका लहानशा गावात जन्म घेतलेला एक मुलगा, सर्वसामान्य परिस्थितीतही उच्च शिक्षण घेतो, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मेंदूरोगतज्ज्ञ होतो, असंख्य लोकांच्या हृदयात स्थान मिळवतो, पद्मश्री मिळते. डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा हा जीवन प्रवास अविश्वसनीय व अतर्क्य आहे. सामाजिक दृरदृष्टी असल्यानेच त्यांना हे यश प्राप्त झाले आहे. व्यस्त व्यक्तिमत्व, मात्र चांगल्या कामासाठी वेळ देणारे म्हणजे डॉ. चंद्रशेखर मेश्राम आहेत. समाजाला परतफेड करावी लागते, ही भावना बाळगणारे, सामाजिक बांधिलकी असणारे, मातीशी नाते असणारा एक चांगला माणूस, असे गौरवोद्गार न्या. गवई यांनी काढले.
आजवर येथवर आलो ते कुटुंब, डॉक्टर्स, विविध क्षेत्रातील परिचित, ही सर्व माझी चमू आहे. डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी हा सन्मान सर्व सहकार्यांचा असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा प्रभाव माझ्या जीवनावर आहे. याशिवाय जीवनात अनेक भेटले. या सर्वांचीच प्रेरणा मिळत आहे. पालकांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. मेश्राम यांना गहिवरून आले. न्या. भूषण गवई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. नम्रता मेश्राम यांचा सत्कार डॉ. वंदना काटे व डॉ. अनुराधा रिधोरकर यांनी केले. संचालन डॉ. शिवानी सुळे यांनी केले.
वैद्यकीय, विधि आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची भरगच्च उपस्थिती होती.