- बेघर निवार्यात 60 वर्षावरील लाभार्थींना मोफत अन्न
नागपूर,
भिक्षेकरी मुक्त शहर करण्यासाठी Nagpur Mahanagarpalika महापालिकेद्वारा संचालित केंद्र शासन पुरस्कृत भिक्षेकरी सर्वसमावेशक पुनर्वसन प्रकल्प राबविल्या जात आहे. नागपूरातील भिक्षेकर्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या निवारा केंद्रात 3489 लाभार्थी आहे. यात पुरुषांची संख्या 3 हजार 303 तर महिलांची संख्या 184 आहे. 60 वर्षांवरील लाभार्थी 840आहे. बेघर निवार्यात 60 वर्षावरील लाभार्थींना मोफत अन्न देण्यात येत असल्याची माहिती अभय कोलारकर यांनी मनपाकडून माहिती अधिकारांतर्गत मिळविली आहे.
बेघरांसाठी 14,673,560 रूपयांचा खर्च
दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत शहरी बेघर निवारा स्थाी 24 कर्मचारी काळजी वाहक म्हणून कार्यरत कर्मचारी आहे. सहारा शहरी बेघर निवारा गणेश टेकडी, उड्डाण पुलाखाली रेल्वे स्टेशन रोड, नागपूर हा निवारा सद्यस्थितीत बंद उड्डाणपूल तुटल्यामुळे बंद करण्यात आला आहे. नागरी बेघर अभियाना अंतर्गत गत 5 वर्षात 312,632 इतकी रक्कम प्राप्त झाली.यात 14,673,560 रूपये खर्च झाले तर 13,440,996 इतकी रक्कम परत गेली आहे.
आस्था निवारागृह सुरु
Nagpur Mahanagarpalika केंद्र शासन पुरस्कृत भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत नागपूर मनपा क्षेत्रात एप्रिल 2022 पासुन आस्था निवारागृह सुरु करण्यात आले. सदर निवारागृह बाबतची माहिती खालीलप्रमाणे केंद्र शासन पुरस्कृत भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात एप्रिल 2022 मध्ये आस्था निवारागृह सुरु करण्यात आले. एप्रिल 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंत आस्था निवारागृहात 607 लाभार्थी आहे. यातील 84 लाभार्थींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तर 106 लाभार्थींना त्यांच्या घरी परत गेले आहे. 21 जणांना वृद्धाश्रमात पाठविले आहे. 11 जणांना मानसिक आरोग्य उपचार केंद्रात तर 10 लाभार्थींना व्यसनमुक्ती केंद्रात पाठविले आहे.
6 ठिकाणी बेघर निवारा केंद्र
परिवार मिलन अंतर्गत घरी परत गेलेल्या लाभार्थी संख्या
वृद्धाश्रम ला पाठविण्यात आलेल्या लाभार्थीची संख्या, मानसिक आरोग्य उपचार घेत असलेल्या लाभार्थी संख्या , व्यसनमुक्ती केंद्रचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी संख्या मनपाचे शहरात 6 ठिकाणी बेघर निवारा केंद्र आहे. यात बुटी कन्या शाळा, बुटी दवाखान्या जवळ, टेम्पल बाजार रोड सीताबर्डी, बोधिसत्व शहरी बेघर निवारा मिशन (जुना) मोहल्ला, इंदोरा, सावली शहरी बेघर निवारा, हंसापुरी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, टिमकी, भानखेडा, आश्रय शहरी बेघर निवारा, जुने सतरंजी पुरा झोन कार्यालय, मारवाडी चौक, इतवारी, आपुलकी शहरी बेघर निवारा समाज भवन परिसर मिशन मोहल्ला, नविन इमारत येथे बेघरांसाठी निवारा केंद्र तयार केले आहे.