जिप पतसंस्थेचा बुधवारी ठरणार ‘शिलेदार’

    दिनांक :18-Feb-2024
Total Views |
- अध्यक्ष, सचिवांची निवडणूक : सर्वाधिक संचालकांचे पारडे जड

यवतमाळ, 
Yavatmal Zilla Parishad : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था अध्यक्ष, सचिवाची निवड बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी नोटीस निर्गमित केली. यात सर्वांधिक संचालक निवडूण आलेल्या संघटनेपैकी एकाची अध्यक्षपदी, तर इतर संघटनेतील संचालकाची सचिवपदी निवड होण्याची शक्यता आहे. यावर सोमवार, 19 फेब्रुवारी रोजी अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दीड वर्षांपूर्वी पार पडलेल्या जिप कर्मचारी सहकारी पतसंस्थेत परिवर्तन पॅनलने बाजी मारली होती.
 
 
y18Feb YZP Patsanstha Logo
 
परिवर्तन पॅनलचे एकूण 21 संचालक निवडून आल्यानंतर शिक्षक संघाचे नेते मधुकर काठोळे यांच्या गळ्यात अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी संजय गावंडे यांची निवड झाली. तर सचिव म्हणून मुकेश भोयर यांच्या नावावर एकमत झाले होते. आता जवळपास दीड वर्षांचा कार्यकाळ झाला असून, पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर काठोळे आणि सचिव मुकेश भोयर या दोघांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवीन अध्यक्ष, सचिवांची निवडीसाठी जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
 
 
Yavatmal Zilla Parishad : यामध्ये जिल्हा पीठासीन अधिकारी म्हणून जी. एस. राठोड यांची नेमणूक केली. बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता नामनिर्देशनपत्र वाटप, स्वीकृती, दुपारी दीड ते 2 वाजता नामनिर्देशपत्र छाननी, दुपारी 2 वाजता वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करणे, तर 2.30 वाजता नामनिर्देशपत्र माघार, त्याचवेळी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करणे, मतदान करणे, 2.30 ते 3.30 वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया, लगेच मतमोजणी होणार असून, निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांचा निकाल घोषित केल्या जाणार आहे.