कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

18 Feb 2024 17:03:39
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Kanyadan Yojana एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रकल्पातील तालुक्यांमध्ये कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे व स्वयंसेवी संस्थांनी योजनेंतर्गत विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पुसद प्रकल्पातील पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, उमरखेड व नेर या तालुक्यातील आदिवासी भागात विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाèया नवदाम्पत्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे.
 

kanyadan 
 
इच्छुक व पात्र सेवाभावी स्वयंसेवी संस्थांनी योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी विहित नमुन्यातील आवेदन व परिपूर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद येथे २६ फेब्रुवारीपर्यंत सादर करावे.
योजनेच्या विवाह सोहळ्यात वर व वधू यांचे वय विवाहाच्या दिनांकास ३५ वर्षांपेक्षा जास्त असू नये, वधू-वरांचा प्रथम विवाह असणे आवश्यक आहे, नवदाम्पत्यापैकी एकजण अनुसूचित जमातीचा असावा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व जोडप्यापैकी एकाचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.Kanyadan Yojana बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायदा अंतर्गत कोणत्याही कलमाचा भंग झालेला नसल्याचे प्रतिज्ञापत्र, विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. वधू व वराचे बँक खाते क्रमांक जोडणे आवश्यक आहे.विवाह सोहळा आयोजित करणाèया स्वयंसेवी संस्थेस प्रती १० जोडपे १० हजार व लग्न सोहळ्यात सहभागी जोडप्यांना १० हजार रुपये अनुदान देण्यात येते, असे प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0