आयुडीपी कॉलनीत प्रगटदिन महोत्सवाची तयारी

Gajanan Maharaj Pragat Din भरगच्च धार्मिक कार्यक्रम

    दिनांक :19-Feb-2024
Total Views |
वाशीम, 
 
Gajanan Maharaj Pragat Din शेगावीचा राणा, विदर्भाचे दैवत श्री संत गजानन महाराजांचा प्रगटदिन जसाजसा जवळ येत आहे तसतसा शहरातील सर्व ‘श्रीं’ च्या मंदिरांमध्ये प्रगटदिन महोत्सवाच्या तयारीस प्रारंभ झाला असून, Gajanan Maharaj Pragat Din शहरातील जुन्या आयुडीपी कॉलनीतील श्री संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने भरगच्च धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Gajanan Maharaj Pragat Din  त्यानिमित्त परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. येत्या शुक्रवार १ मार्च ते रविवार, २ मार्चपर्यत हा महोत्सव श्री संत गजानन महाराज मंदिरात हा महोत्सव होणार आहे.
 
 

Gajanan Maharaj Pragat Din 
 
 
Gajanan Maharaj Pragat Din प्रगट दिनानिमित्त सेवा समितीने या तीन दिवसात विविध कार्यक्रम जाहीर केले असून, त्यामध्ये सकाळी ५ ते ७ काकड आरती, ‘श्रीं’ स अभिषेक व श्रीं ची आरती, सायंकाळी ६ ते ७.३० हरिपाठ व श्रीं ची आरती असे दैनंदिन कार्यक्रम घोषित करण्यात आले आहेत. Gajanan Maharaj Pragat Din शुक्रवार १ मार्चला सकाळी ९ ते १ वाजेपर्यत देविदास महाराज कोरान्ने यांच्या आचार्यत्वाखाली रुद्रयाग (महायज्ञ) प्रारंभ, देवता आवाहन होईल. दुपारी २ ते ४ पर्यत वाळकेश्वर भजनी मंडळ टिळक चौक यांचे भजन, सायंकाळी ७ ते ८ पर्यत लेखक, संगीत विशारद व राष्ट्रीय किर्तनकार किसनराव गंगावणे लिखित भक्तीमार्ग प्रदिप या पुस्तकाचे प्रकाशन होईल. रात्री ८ ते १० पर्यत हभप सुशिल महाराज वनवे शेगाव यांचे राष्ट्रीय किर्तन होईल. शनिवार, २ मार्चला सकाळी ८ ते १० पर्यत रुद्रयाग (महायज्ञ), सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यत ‘श्रीं’ चा पालखी सोहळा व नगर परिक्रमा होईल. Gajanan Maharaj Pragat Din सायं. ७ ते १० पर्यत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी सर्व वारकरी व भक्तांच्या भोजनाची व्यवस्था व्यंकटेश टाईल्सकडून केल्या जाईल. रविवार, ३ मार्चला सकाळी ८ ते १० पर्यत रुद्रयाग (महायज्ञ) पूर्णाहुती, १० ते १२ पर्यत हभप रविंद्र महाराज खोसे पुणे यांचे काल्याचे किर्तन होईल.
 
 
त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज भजनी मंडळ भटउमरा, श्री गजानन महाराज वारकरी मंडळ, संकटमोचन हनुमान हरिपाठ मंडळ साथसंगत करतील. दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. Gajanan Maharaj Pragat Dinआयुडीपीतील श्री संत गजानन महाराज सेवा समिती ट्रस्ट अंतर्गत मंदिरास देण्यात येणारी देणगी ही आयकर कायद्यानुसार आयकरातुन सवलत मिळण्यास पात्र आहे. तसेच दरवर्षी मंदिर सेवा समिती विविध धार्मिक, सामाजीक, शैक्षणिक व वैद्यकिय उपक्रम सातत्याने राबवत असते. त्यामध्ये दर गुरुवारी महाप्रसाद, श्रीं चा प्रगटदिन उत्सव, श्रीराम नवमी उत्सव, ऋषिपंचमी उत्सव, गुरुपोर्णिमा उत्सव, दर एकादशील किर्तन, श्री दत्त जयंती उत्सव,, योग शिबीर, रक्तदान शिबिर, लसीकरण, दर गुरुवारी मोफत रुग्ण तपासणी व औषधोपचार, गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आदी उपक्रमाचा समावेश आहे. Gajanan Maharaj Pragat Din येणाऱ्या श्रीं च्या प्रगटदिन महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंदिर सेवा समितीसह भाविक भक्त अथक परिश्रम घेत आहेत.