‘त्या’ प्रवेशद्वाराला मिळाली ना हरकत !

anjangaon surji-dispute पांढरी खानमपूरचा वाद मिटला

    दिनांक :19-Feb-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
अंजनगाव सुर्जी, 
 
anjangaon surji-dispute तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे फलक लावण्यावरून काही दिवसांपूर्वी तणाव निर्माण झाला होता. प्रवेशद्वारसंबंधी वरिष्ठांची नाहरकत नसल्याचे ग्रामपंचायत सचिवाने सांगितले होते. anjangaon surji-dispute त्यानंतर रिपाइंचे विधानसभा संघटक अ‍ॅड. दीपक सरदार यांनी याप्रकरणी महत्त्वाची भूमिका निभावत प्रवेशद्वार बसविण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांचेकडे रीतसर तक्रार केल्यानंतर अखेर 16 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रवेशद्वार लावण्यासंदर्भात नाहरकत दिल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.anjangaon surji-dispute
 
 
 
anjangaon surji-dispute
 
 
2020 मध्ये ग्रामपंचायत पांढरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य प्रवेशद्वार बसविण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला होता. मात्र 4 वर्ष झाले तरी ग्रामपंचायत प्रवेशद्वार लावण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने 26 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत पुन्हा याच विषयावर चर्चा करण्यात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार लावण्याचे निश्चित केले; anjangaon surji-dispute मात्र ग्रामपंचायतने याबाबत काहीच पुढाकार न घेतल्याने अखेर 14 फेब्रुवारी रोजी गावातील अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार, पांढरी असे फलक लावले. यामुळे त्याठिकाणी दोन गटात तणाव निर्माण झाला होता.
 
 
anjangaon surji-dispute अ‍ॅड. दीपक सरदार यांनी अनुयायांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रीतसर निवेदन दिले. त्या निवेदनाची दखल घेत सीईओ यांनी त्या प्रवेशद्वाराला नाहरकत प्रमाणपत्र देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार बांधकाम करण्यासाठी तातडीने पत्रव्यवहार केला. नाहरकत मिळाल्याने आंबेडकरी अनुयायी यांनी जय भीमचा जयघोष करत अ‍ॅड. दीपक सरदार यांचा सत्कार केला. anjangaon surji-dispute दीपक सरदार यांनी आवाहन केले की, येत्या आठ दिवसात प्रवेशद्वार बांधकाम पूर्ण करा, अन्यथा आम्ही गावकरी ते काम पूर्ण करू. यावेळी विनोद रायबोले, नीलेश रायबोले, रत्नदीप रायबोले, रवींद्र रायबोले, छाया अभ्यंकर, महेश वाकपांजर, सागर रायबोले, विकास रायबोले, शुभम रायबोले, आशिष मोहोड, अंकुश इंगळे व गावकरी मंडळी उपस्थित होते.