वाशीम,
bachat gat-washim राज्य शासनाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) ची स्थापना १९७५ मध्ये केली, महिलांचा सर्वागीण विकास साधण्याचा उद्दात हेतू घेऊन महिला बचत गटाची संकल्पना राबविली. bachat gat-washim आज बचत गटांनी प्रगती साधली आहे. सीएमआरसीची निर्मिती होऊन १२ वर्ष झाले आहेत. bachat gat-washim त्यामुळे महिला बचत गट केवळ एक संस्था नसून शासनाचे अविभाज्य भाग असून कुटुंब झाले आहे, असे गौरवोद्गार आमदार अमित सुभाषराव झनक यांनी केले.
माविम स्थापित लोकसंचालित साधन केंद्र, मालेगाव २ ची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मॉ साहेब लॉन, मालेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडली. मालेगाव तालुयातील ३५ गावामधील ३०२ गटाचे नेतृत्व करणार्या या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष सुनिता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. bachat gat-washim सभेस उद्घाटक म्हणून आमदार अमित झनक उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून माविमचे अधिकारी केशव पवार, राजेश नागपुरे, नाबार्डचे शंकर कोकडवार, आरसेटीचे संचालक डी. एम. बोईले, रामेश्वर आप्पा गोंडाळ, उत्तमराव राठोड तसेच अतिथी म्हणून संचालक लता खडसे, वैशाली गायकवाड, संगीता गायकवाड, रेखा कांबळे, कौशल्या गव्हांदे, शिला कंकाळ, वंदना गायकवाड, विमल मुठाळ उपस्थित होते.
bachat gat-washim सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन या सभेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे व्यवस्थापक प्रा. शरद व्ही कांबळे यांनी संस्थेचा सन २०२२- २३ चा लेखाजोखा सादर केला. संस्थेचे ऑडीट काम, मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, वार्षिक लिंकेज, बिझनेस प्लान मंजुरी देणे, विविध प्रकल्प राबविणे, गोडंबी युनीट मान्यता, अधिकारी व कर्मचारी यांना २० टक्के मानधन वाढ देणे, सीएमआरसीला दुसरा व चौथ्या शनिवार सुट्टी देणे, कार्यालय दुरुस्ती व रंगकाम करणे सहयोगीनी फिल्ड व्हीजीट वाढविणे, उत्पन्नानुसार मानधन देणे इत्यादी ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आले. bachat gat-washim यावेळी आमदार अमित झनक म्हणाले, महिलांनी बचत गट, माविमच्या माध्यामातून आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास साधला आहे. आता उद्योगात भरारी घेतली ही बाब वाखाणण्याजोगी आहे. आरएमओ केशव पवार यांनी मार्गदर्शन करतांना माहिलांनी आर्थिक, सामाजिक व राजकिय दृष्ट्या सक्षम होवून आपल्या अपत्यांना भयमूक्त धाडसी अंधश्रद्धेपासून परावृत्त केले पाहिजे.
तसेच गौतमबुद्ध यांच्या पंचशीलनुसार पंचसूत्रीचे पालन करुन एकजुटीने काम करावे, असे आवाहन केले. bachat gat-washim महिलांचे संघटन हेच सीएमआरसीचे यश आहे, असेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी नाबार्डचे डीडीएम शंकर कोकडवार, आरसेटीचे संचालक डी एम बोईले यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात तिरंगा थाळी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना तसेच पुरुष सुधारक सन्मान पुरस्कार वितरीत करण्यात आले. bachat gat-washim उत्कृष्ट काम करणार्या बचत गटाच्या महिला, सहयोगीनी यांना प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शरद कांबळे यांनी केले तर आभार व्यवस्थापक प्रदीप तायडे मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेखापाल अनित्य सावळे, सहयोगीनी पुष्पा गवळी, चंद्रभागा माने, सुनिता सुर्वे, जया गायकवाड, भारती चक्रनारायण यांनी परिश्रम घेतले. या सभेस महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.