विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणाचा विचार व्हावा !

19 Feb 2024 20:27:48
तभा वृत्तसेवा
 
अमरावती, 
 
reservation for Dhangar मराठा आरक्षणासाठी मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार असून या अधिवेशनात मराठा समाजाला कसे आरक्षण देता येईल? यावर विचार विमर्श करण्यात येणार आहे. धनगर समाजाचीही आदिवासी प्रवर्गात आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी अशी अनेक वर्षापासून मागणी आहे. reservation for Dhangar या मागणीचाही विशेष अधिवेशनात विचार व्हावा, अशी मागणी विदर्भ धनगर परिषदेचे अध्यक्ष दिलीप एडतकर यांनी केली आहे. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी महायुतीचे घटक असलेल्या चार सरकारी धनगर आमदारांनी हा मुद्दा उद्या आक्रमकपणे लावून धरावा असे आवाहनही अ‍ॅड. एडतकर यांनी त्यांना केले आहे.reservation for Dhangar
 
 

reservation for Dhangar 
 
 
उच्च न्यायालयाने धनगर समाजातर्फे दाखल असलेल्या आरक्षणाच्या संदर्भातील याचिका फेटाळून लावल्या असून आरक्षण देणे न्यायालयाचे काम नाही तर ते संसदेचे काम असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र विधिमंडळाने संसदेकडे तशी मागणी करावी व पूर्वीपासूनच धनगर या नावाने आरक्षित असलेल्या धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे व त्यासंदर्भात विशेष अधिवेशनात विचार व्हावा. reservation for Dhangar धनगर समाजाचे चार आमदार विधिमंडळात असून हे चारही आमदार महायुतीशी संबंधित आहेत. त्यात विधान परिषदेतील आ. गोपीचंद पडळकर, आ. राम शिंदे व समाज राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आ. दत्ता भरणे यांचा समावेश आहे.
 
 
त्यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात धनगराच्या आरक्षणावरही चर्चा घडवून आणावी, असे आवाहन अ‍ॅड. एडतकर यांनी केले आहे. लोकसभेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. reservation for Dhangar या अधिवेशनात भाजपने धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा महाराष्ट्रातील अस्सल धनगर भाजप व भाजपा समर्थितांना मतदान करणार नाही याची नोंद संबंधितांनी घ्यावी असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0