मुंबई,
Joram released on OTT 8 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला 'झोरम' 'ॲनिमल' आणि 'सॅम बहादूर'च्या सुनामीत वाहून गेला असेल, पण समीक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले. बॉक्स ऑफिसवर डुबलेला हा चित्रपट ज्या कोणी पाहिला, त्याने त्याचे कौतुक केले. थिएटरनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी मनोज बाजपेयी यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चाहत्यांसह 'झोरम'च्या ओटीटी रिलीजची माहिती शेअर केली.

हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेजन प्राइम वीडियोवर स्ट्रिम होत आहे. पोस्ट शेअर करताना मनोजने कॅप्शनमध्ये लिहिले की, "तुमचा आवडता सर्व्हायव्हल थ्रिलर आता अमेजन प्राइम वीडियोवर आहे." मनोज बाजपेयींच्या 'झोरम' चित्रपटाला यावर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षकाचा पुरस्कार मिळाला आहे. 'जोरम' ही एका बापाची कथा आहे जो आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी पळून जातो. Joram released on OTT तो आपले गाव सोडून पत्नी आणि मुलीसह शहरात जातो, परंतु त्याचा भूतकाळ त्याला सतावतो. त्याच्या पत्नीचा खून झाला आहे आणि तो आपला आणि आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी घरोघरी भटकतो आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयीसोबत स्मिता तांबे, राजश्री देशपांडे, मोहम्मद जीशान अय्युब आणि तन्निष्ठ चॅटर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवाशिष माखिजा यांनी केले आहे.