गोंदिया,
Gondia Collector : येथील जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्यासह राज्यातील काही आयएएस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 1 फेब्रुवारी रोजी जारी केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत प्रजीत नायर यांची गोंदियाचे जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. गोतमारे यांचे नागपूर येथील विदर्भ विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी स्थानांतर झाले आहे.
प्रजीत नायर Gondia Collector हे 2017 च्या आयएएस तुकडीचे अधिकारी आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांना जिल्हाधिकारीपदी पहिल्यांदाच बढती मिळाली आहे. सिंधुदुर्गात नायर यांनी कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी बजावली आहे. चिन्मय गोतमारे यांचाही कार्यकाळ समाधानकारक आहे. प्रथमच जिल्हाधिकारी पदभार स्वीकारल्यानंतर नायर सर्वसामान्यांमध्ये एक व्यावहारिक अधिकारी म्हणून स्वत:ला कसे सिद्ध करतील हे यांच्यापुढे आव्हानात्मक राहील. सोमवार 5 फेब्रुवारी रोजी नायर कार्यभार स्वीकारणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगीतले.