कुरखेडा नगरपंचायतीच्या विषय समीतीत तिन्ही पक्षाला समान संधी

    दिनांक :20-Feb-2024
Total Views |
कुरखेडा, 
Kurkheda Nagar Panchayat : कुरखेडा नगरपंचायतच्या आज घेण्यात आलेल्या वार्षिक विषय समितीच्या निवडणूकीत सभागृहातील तिनही पक्षाचा प्रत्येकी एका सदस्याला सभापती पदावर सर्वानूमते संधी देण्यात आली आहे.
 
 
sdfs
 
यावेळी भाजपा व काँग्रेस यांनी आपले मागील वर्षाचा चेहर्‍यांनाच पुन्हा संधी दिली आहे. तर शिवसेने मात्र भाकरी फीरवत यावेळी नव्या चेहर्‍याला संधी दिली आहे. येथे आज घेण्यात आलेल्या निवडणूकीत बांधकाम समिती ही उपाध्यक्ष कलाम शेख यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहे. तर आरोग्य व स्वच्छता समितीवर भाजपाचे घनश्याम झोळे यांची पूर्ववत निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीवर काँग्रेसच्या कुंदा तितिरमारे व उपसभापती पदावर भाजपाच्या दूर्गा गोटेफोडे यांना कायम ठेवण्यात आले आहे. मात्र पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीवर यावर्षी शिवसेनेने बदल करीत जयेंद्र सिंह चंदेल यांच्याऐवजी अशोक कंगाले यांची निवड केली आहे.
 
निवडणूक प्रक्रिया पिठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी विवेक साळूंखे, सहाय्यक पिठासीन अधिकारी मुख्याधिकारी पंकज गावंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. सर्व पक्षांना समसमान संधी देण्यात आली. त्यामुळे खेळीमेळीचा वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री रविंद्र गोटेफोडे, माजी नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, नगराध्यक्ष अनिता बोरकर, काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष आशा तुलावी, शिवसेना गटनेता आशिष काळे, पुंडलिक देशमुख, विजय पुस्तोडे तसेच सर्व विद्यमान नगरसेवक हजर होते.