तभा वृत्तसेवा
पुसद,
pusad-corruption नगर परिषद पुसदचे बांधकाम विभागप्रमुख व अभियंता गिरीश डुबेवार यांनी जुन्या बांधकामातील लोखंडी खिडक्या अन्यत्र हलविल्याने त्यांचे सर्व पदभार काढून घेण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी दिली. pusad-corruption बांधकाम विभागाकडून काही जुन्या पाडकामामधील लोखंडी खिडक्या त्यांनी परवानगी न घेता अन्यत्र नेल्याचे प्रकरण पुढे आले होते. ही बाब काही जागरूक नागरिकांनी मुख्याधिकारी वायकोस यांना लक्षात आणून दिली होती. pusad-corruption
त्यामुळे डुबेवार यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. pusad-corruption याबद्दल प्रतिक्रिया देताना गिरीश डुबेवार यांनी त्या लोखंडी खिडक्या वासवी भवन येथील कामात उपयोगात आणल्या जाणार होत्या व त्यामुळे नपच्या खर्चात बचत होणार होती, असे सांगितले होते. pusad-corruption मात्र आज त्यांचा पदभार काढण्यात आल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले असून उपमुख्याधिकारी अंबादास मेरगे यांना या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आल्याची माहिती आहे.