बिबट्या तीन दिवसांपासून झाडावर

21 Feb 2024 20:31:08
कळंब, 
कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून Dongarkharda- Leopard बिबट्या वाघाने शौकतअली सय्यद यांच्या शेतातील शिरस या जातीच्या झाडावर तळ ठोकल्यामुळे गावामध्ये एकच दहशत निर्माण झाली आहे. हा बिबट्या सोमवारपासूनच झाडावर चढला होता. परंतु मंगळवारी काही लोकांना तो दिसला. त्यामुळे गावातील लोकांनी बघ्याची भूमिका घेत या शेताकडे धाव घेतली. याची माहिती डोंगरखर्डा येथील नागरिरिकांनी वनविभागाचे दिलीप केराम यांना दिली.
 
 
y21Feb-Bibtya
 
Dongarkharda- Leopard : वनविभागाचे पथक डोंगरखर्डा गावात पोहोचले. मंगळवारी संध्याकाळी सहा साडेसहाच्या जवळपास टीम पोचली. तेव्हा अंधार झाला होता. त्यामुळे बिबट्या मंगळवारी खाली उतरू शकला नाही. परंतु बुधवारीसुद्धा वनविभाग बिबट्याला झाडावरून उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. परंतु दुपारी 3 पर्यंत तरी बिबट्या झाडावरून उतरला नव्हता. त्यामुळे डोंगरखर्डा परिसरात एकच दहशत असून यापूर्वीसुद्धा या भागात वाघ असल्याची चर्चा झाली असल्याने शेतकरी वर्ग चिंताग‘स्त आहे. यापूर्वीसुद्धा नांझा पोटगव्हाण डोंगरखर्डा झाडकिनी या भागांमध्ये वाघ दिसल्याने व शेतकर्‍यांचे वाघाच्या दहशतीने शेतात जाणे होत नसल्याने वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे पिकांचे नुकसान होत होते.
 
 
या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा याकरिता यापूर्वी कळंब तहसीलवर त्या भागातील नागरिकांनी मोर्चासुद्धा काढला होता. त्यामुळे वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तत्काळ करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या बिबट्याचा बंदोबस्त लावून त्याला जंगलात सोडण्याकरिता कळंब तालुका वन विभागाचे पथक घटनास्थळी उपस्थित आहे.
माणसाची भीती मोठी
सकाळपासून आम्ही पिंजरे आणि जाळे लावलेले असून बिबट्याला उतरवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु अजूनपर्यंत बिबट्या उतरलेला नाही, असे कळंब वनविभागाचे अधिकारी प्रदीप निवल यांनी सांगितले. बिबट्या चढलेल्या झाडाला सध्या परिसरातील माणसांनी घेरलेले आहे. त्यामुळे माणसांच्या भीतीने तो खाली उतरण्यास ‘घाबरत’ आहे, असे वनखात्यातील जाणकारांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0