महागावमध्ये विषय समित्यांवर महाविकास आघाडीच

21 Feb 2024 20:45:42
- स्थायी समिती अध्यक्ष सुनंदा कोपरकर व बांधकाम सभापती विशाल पांडे

महागाव, 
Mahagaon Nagar Panchayat : महागाव नगर पंचायतच्या विषय समित्यांवर महाविकास आघाडीचा वरचष्मा कायम राहिला असून सर्व समित्यांची निवड अविरोध पार पडली असून स्थायी समिती अध्यक्षपदी नगर परिषद अध्यक्ष सुनंदा कोपरकर तर बांधकाम सभापतीपदी विशाल पांडे यांची अविरोध निवड करण्यात आली. महागाव नगर पंचायतच्या स्थायी, बांधकाम, आरोग्य व स्वच्छता, महिला बालकल्याण, पाणीपुरवठा समित्यांची निवड प्रक्रिया वर्षभरानंतर पार पडली. यात स्थायी समिती अध्यक्षपदी नप अध्यक्ष सुनंदा दिलीप कोपरकर, पाणीपुरवठा सभापतीपदी उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे, बांधकाम सभापतीपदी विशाल पांडे, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी गजानन साबळे, महिला व बालकल्याण सभापतीपदी रूपाली संतोष कोल्हेकर, तर उपसभापतीपदी सुनीता शिवाजी डाखोरे यांची अविरोध निवड करण्यात आली.
 
 
y21Feb-Mahagav
 
Mahagaon Nagar Panchayat : या सर्व समित्यांची निवड अविरोध होण्याकरिता सत्ताधारी महाविकास आघाडीला यश आले असून यामुळे विरोधी भाजपा गटाला मात्र काटशह देण्यात महाविकास आघाडीचे नेते संभाजी नरवाडे, शैलेश कोपरकर, सुजितसिंह ठाकूर, नारायण शिरबिरे यशस्वी झाले आहेत. यावेळी निवडणूक अविरोध होण्यासाठी माजी अध्यक्ष, नगरसेवक करुणा शिरबिरे, नगरसेवक जयश्री इंगोले, नगरसेवक महेश पाटील यांनी सहकार्य केले. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी बिज्वल यांनी काम पाहिले.
भाजपाचे गजानन साबळे आरोग्य व स्वच्छता समिती सभापती
Mahagaon Nagar Panchayat : मागील नपं अध्यक्ष निवडणुकीत भाजपाचे गटनेते गजानन साबळे यांनी भाजपातील अंतर्गत वादाला कंटाळून आपले मत महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकून काँग्रेस व शिवसेनेची सत्ता महागाव नगर पंचायतवर स्थापन होण्यासाठी मोलाची मदत केली होती. ते मागील काळात बांधकाम सभापतीपदी विराजमान होते. नगर पंचायतमध्ये महाविकास आघाडीला केलेल्या मदतीची जाण सत्ताधारी काँग्रेस, शिवसेनेने ठेवून साबळे यांची आरोग्य व स्वच्छता समिती सभापतीपदी अविरोध निवड केली आहे.
Powered By Sangraha 9.0