वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून वाशीम जिल्ह्याला वगळले

21 Feb 2024 17:12:34
वाशीम,
River Linkage Project : विदर्भातील वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा राज्यस्तर नदीजोड प्रकल्प असून प्रकल्पाव्दारे वैनगंगा नदीवरून गोसीखुर्द प्रकल्पात पावसात उपलब्ध होणारे पाणी वैनगंगा उपखोर्‍यातून पूर्णा तापी खोर्‍यातून पाणी शेतकरी व लोकांना उपलब्ध होणार आहे.
 
 
01
 
 
 
सिंचन घरगुती व औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. सदर प्रकल्पात विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. वाशीम जिल्ह्याचा समावेश करणार असल्याचे शासनाने आश्वासन दिल्यानंतरही या प्रकल्पातून वाशीम जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. वाशीम जिल्ह्याचा इतिहास व भुगोल बदलणार्‍या या अति महत्वकांक्षी प्रकल्पातून जिल्ह्याला वगळण्यात आल्याने लोकप्रतिनिधीबाबत लोकांमध्ये तिव्र आक्रोश व्यक्त केल्या जात आहे.
 
सदर प्रकल्पात वाशीम जिल्हयाचा तत्काळ समावेश करून तशी अधिसुचना जाहिर व्हावी याकरीता वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्पाचे मुख्य संयोजक हरिष सारडा हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेवून निवेदन देण्यासाठी मुंबई येथे रवाना झाले आहेत.
 
याकरीता आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असून, लवकरच जिल्ह्यातील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते, संघटना, सिंचनप्रेमी यांच्यासोबत तिव्र आंदोनल उभे करणार असल्याची माहिती हरिष सारडा यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0