नेमके काय आहे आँक्सीजन लेव्हल...

    दिनांक :21-Feb-2024
Total Views |
oxygen level हल्ली आँक्सीजन लेव्हल कमी झाली हे वाक्य कोरोना काळात खूपदा ऐकले. अनेकांना प्रश्न पडत असतो आँक्सीजन लेव्हल म्हणजे काय ती कमी झाली तर काय करणार वगैरे असंख्य प्रश्न या अनुशंगाने मनात असतात. याच सर्व सामान्यांच्या मनात साचलेल्या प्रश्नांची उत्तर आज मी वैद्य. गजानन माध्यमातून तुमच्या पुढ्यात उलगडणार आहे.समस्त प्राणीमात्रांच्या जीवनात आँक्सीजनचे अनन्यसाधारण महत्व आहे. ऑक्सिजन हे आपल्या पेशींचे सर्वात महत्वाचे पोषण आहे, आपल्या शरीरातील प्रत्येक कार्य ऑक्सिजनवर अवलंबून असते आणि हे आपल्या शरीर आणि स्नायूंसाठी जणू एक शक्ती असते.

oxygen level 
 
 
आपल्या फुफ्फुसांतून श्वासोच्छ्वास करणे, आपल्या पेशींना ऑक्सिजन प्रदान करणे, आपल्या मेंदूच काम सुरळीत ठेवणे आणि हृदयाची धडधड नियंत्रित ठेवणे आँक्सीजन मुळे शक्य होते. शरीरात ऑक्सिजनचा अभाव अनेक आजारांना कारणीभूत ठरतो. जेव्हा ऑक्सिजनची पातळी कमी होते, तेव्हा जलद आणि सर्वात वाईट परिणाम प्रतिकारशक्तीवर होतो. अशा परिस्थितीत कोणतेही विषाणू आणि जीवाणू आपल्या शरीरावर प्रभुत्व मिळवू शकतो.म्हणून तर कोरोनाचा माहामारीच्या काळात आँक्सीजन लेव्हल कमी होणारी लोकच जास्त संक्रमीत होत असताना पहायला मिळतील. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्यामागचे कारण अनेकदा प्रदूषण असते. प्रदूषणामुळे शरीरात ऑक्सिजनचा स्तर कमी होऊ लागतो. फुफ्फुसांचे काम सुरळीत होत नाही आणि शरीरात इतर समस्या वाढतात. शरीरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू लागते. याला कार्बोऑक्सिहीमोग्लोबिन म्हणतात आणि अनेक आजारांचे हे कारण असते. शरीरात ऑक्सिजनची कमतरता अनेक आजारांना निमंत्रण देते. ९०पेक्षा कमी ऑक्सिजन असल्यास थकवा, स्किन ॲलर्जी, डोळ्यांमध्ये जळजळ, सर्दी-ताप, अस्थमा, दमा, ॲलर्जी, मायग्रेन, फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन, खोकला आणि डोळ्यांचा थकवा हे आजार प्रदूषणामुळे होतात. या सगळ्यामागचे कारण म्हणजे शरीरात ऑक्सिजनची कमतरता होय.
पल्स आँक्सिमेट्री टेस्ट.
आँक्सीजन चे प्रमाण व ह्रदयाचे कार्य पाहण्यासाठी पल्स ऑक्सिमेट्री टेस्ट केली जाते. सर्वसाधारणत: शरीरातील ऑक्सिजनची पातळी 99% असावी, जर ती 96% च्या खाली गेली तर ती व्यक्ती हायपोक्सियाचा बळी बनते. जेव्हा फुफ्फुसांचा आजार असतो, तेव्हा ऑक्सिजनची पातळी प्रथम कमी होते. मग हापणे, दमणे, श्वास लागणे, अशक्तपणा आणि रक्ताची कमी ही त्याची लक्षणे आहेत. ही पातळी मोजण्यासाठी. या साठी पल्स ऑक्सिमेट्री ही एक सोपी आणि वेदनारहित टेस्ट असते. ही टेस्ट तुमच्या शरिरातली, रक्तातील ऑक्सिजन मोजण्याचे काम करत असते. या टेस्टने तुमच्या शरिरातील ऑक्सिजनशी संबंधित लहानसहान बदल लगेच कळत असतात. पल्स ऑक्सिमीटर हे एक चिमट्याच्या आकाराचे यंत्र आहे. हे यंत्र बोटांना किंवा कानाच्या पाळीला सहज लावता येऊ शकते. हल्ली या चाचणीला महत्त्व येण्याचे कारण म्हणजे श्वसनात अडचण येणे हे कोरोनाचे प्रमुख लक्षण मानले जाते. या टेस्टमुळे याचा शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जात असल्याने कोरोना इन्फेक्शनचा छडा लावायला मदत होते. या टेस्ट मुळे फुफुसाची औषधे कशा प्रकारे काम करत आहेत हे तपासण्यासाठी मदत होते, एखाद्याला श्वसनासाठी मदतीची गरज आहे का हे तपासण्यासाठी मदत होते, रुग्णासाठी व्हेंटिलेटर किती उपयोगी आहे याचे मूल्यमापन करणे सोपे जाते, रुग्णासाठी पूरक ऑक्सिजन लावणे किती प्रभावी ठरू शकेल याचा अंदाज बांधता येतो, रुग्णाचे शरीरातील बदल स्वीकारण्याची किती तयारी आहे हे तपासणीसाठी या टेस्ट चा उपयोग होतो.
जर तुम्हाला श्वास घेताना त्रास, थकायला, हुपीग करायला होत असेल. आँक्सीजन लेव्हल सतत खाली खाली जात असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या फँमेली डॉक्टरांचा सल्ला लगेचच घ्यायलाच हवा.
 
शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेची लक्षणे.
शरीराची नियमित क्रिया सहजतेने चालविण्यासाठी आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही.
ऑक्सिजनची कमतरता येते, तेव्हा त्या व्यक्तीस प्रथम थकवा जाणवू लागतो, श्वास घेण्यास त्रास होतो किंवा दम लागतो. यानंतर शरीरातील रक्तातील गती मंदावते. यामुळे थकवा, जीव घाबराघुबरा होतो.
जर शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर ब्रेनस्ट्रोक या मेंदू च्या संचलनात बिघाड होतो, हृदयविकाराचा झटका येण्याची स्थिती बनते. साखरेच्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्यास, त्यांची साखर अचानक वाढू शकते, जी एक जीवघेणी स्थिती देखील बनू शकते. ऑक्सिजनची पातळी अचानक खूप कमी झाल्यास शरीरातील थायरॉईड संप्रेरकाचे संतुलन बिघडते. अशा परिस्थितीत थायरॉईडची पातळी एकतर खूप वाढू शकते किंवा खूपच कमी होऊ शकते. यामुळे हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझमची समस्या उद्भवू शकते.
आँक्सीजन लेव्हल कमी होण्याची इतर कारणेः
जे लोक अतिशय विलासी जीवनशैली जगतात, म्हणजेच शारीरिक हालचाली होत नाहीत, व्यायामाचा अभाव असतो. त्यांच्या शरीरात ऑक्सिजनचा देखील अभाव असतो. जे लोक बर्‍यापैकी शारीरिक श्रम करतात, परंतु त्यानुसार आहार घेत नाहीत, त्यांच्या शरीरातही ऑक्सिजनची कमतरता असू शकते. जर लोकांच्या आहारात लोहाचे प्रमाण कमी असेल, जर ते जास्त वेळ असेच आहार घेत राहिले, तर त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता असू शकते. कारण फुफ्फुसांसह संपूर्ण शरीरात ऑक्सिजनच्या प्रवाहामध्ये लोहाची महत्त्वपूर्ण भूमिका असते.हिमोग्लोबिन ची कमतरता हे सुध्दा एक कारण असते ज्यामुळे आँक्सीजन लेव्हल प्रभावित होते.
आँक्सीजन लेव्हल कमी करणारे आजार.
क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज(COPD),अस्थमा,न्यूमोनिया,फूफुसाचा कॅन्सर,ऍनिमिया,हार्ट अटॅक,जन्मजात हृदयरोग
आँक्सीजन च्या लेव्हल मधील हिमोग्लोबिन व लोहाची भुमिकाः
हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. यावरून हिमोग्लोबिन व लोह किती परस्पर पुरक आहेत हे लक्षात येईल. हिमोग्लोबिन हे रक्त पेशींमध्ये लोह किंवा लोहयुक्त प्रथिने असते. मानवी शरीराच्या वेगवेगळ्या भागात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करते. संपूर्ण शरीरातील संचलनासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे.oxygen level मुळात, हिमोग्लोबिन फुफ्फुसातून ऑक्सिजन घेते आणि रक्ताद्वारे संपूर्ण शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवते. व कार्बनडाय आँक्साईडला दुर करते.
हिमोग्लोबिनची सामान्य पातळी काय आहे?
हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण १७ ते २२ असू शकते, लहान मुलांमध्ये हे प्रमाण ११ ते १३ असायला हवे. प्रौढ वयातील महिलांमध्ये याचे हिमोग्लोबिन १२ ते १६ तर पुरुषांमध्ये हे प्रमाण १४ ते १८ असणे गरजेचे आहे. मात्र प्रत्येकाच्या आहारानुसार यात कमी जास्त प्रमाण होण्याची शक्यता दाट असते. शरीरात आदर्श हिमोग्लोबिनचे प्रमाण असण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. आपल्या शरीरात लोहाची एकूण मात्रा शरीराच्या वजनानुसार 3 ते 5 ग्रॅम असते. जेव्हा ते कमी होते तेव्हा रक्ताची निर्मिती कमी होते. भारतात ह्याची कमतरता ६० टक्के लोकात आहे म्हणून अँनिमिया चे प्रमाण जास्त आहे.
आँक्सीजन वाढीचे स्त्रोतः
आंबा, लिंबू, टरबूज, पपई आणि नवलकोल ही फळे आहेत, जी आपली मूत्रपिंड स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. जीवनसत्त्वे असलेले हे फळ आपल्या रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यात देखील मदत करतात. अ‍वोकॅडो. मनुका, आणि गाजर हे देखील शरीरात ऑक्सिजन वाढीसाठी पुरक आहेत .या मध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात.अंकुरलेले धान्य फायबरचे समृद्ध स्त्रोत आहेत. रक्तातील ऑक्सिजन वाढविण्यासाठी हे चांगले पर्याय म्हणून देखील वापरले जातात. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यात शतावरी, जलकुंभी आणि समुद्री शैवाल देखील खूप उपयुक्त आहेत. जर तुलसी काढा नियमितपणे सेवन केले, तर प्रदूषणाचा परिणाम प्रभावीपणे कमी केला जाऊ शकतो. यासाठी तुळशीची पाने, आले, गूळ आणि दोन काळी मिरी घाला आणि एका कपभर पाण्यात उकळून घ्या ते अर्धे झाले की गाळून प्या.
जिलेटीन हा एक मांसाहारी पदार्थ आहे, उत्पादक प्राण्यांच्या स्नायू, हाडे आणि त्वचेपासून कोलेजेन काढतात. कोलेजेन हे एक प्रोटीन आहे जे मनुष्यात आणि प्राण्यांमध्ये आढळते. शरीरात त्वचा, हाडे आणि टेंडन मध्ये हे मोठ्या प्रमाणात असते. त्यास जिलेटिनमध्ये रुपांतरीत करतात, जे काही प्रमाणात जेलीसारखे दिसते. यात सामान्यत: ग्लायसीन, प्रोलिन आणि व्हॅलिन नावाचे अमीनो अँमिनो अँसीड असतात. यात कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. त्यात फायबरचीही मात्रा असते. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
धावणे, जॉगिंग, ब्रिस्क वाँक, सायकलिंग किंवा एरोबिक्ससारखे कार्डिओ व्यायाम, तसेच प्राणायाम योगा शरीरातील ऑक्सिजनची सामान्य मात्रा राखतात. या दरम्यान, व्यक्ती श्वास घेते सोडते या हलचाली जलद होतात. ज्यामुळे फुफ्फुस निरोगी राहतात. दररोज व्यायामासाठी 45 मिनिटे करा. हे सारे घरगुती उपचार आहेत या शिवाय आयुर्वेदिक, होमिओपॅथी, अँलोपँथिक अनेक औषध उपलब्ध असून तुमचे डॉ.oxygen level तुमचा शरीरातील लक्षणांनुसार औषधरचना करतात. तेव्हा असा काही त्रास असल्यास आपल्या फँमेली डॉ. ना संपर्क करा. 
वैद्यगजानन, निरामयआयुर्वेदप्रचार