नागपूर,
IIIT Nagpur-placement इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुरु झाल्यानंतर नामवंत कंपन्यांचा ओढा आता नागपूरकडे वाढला आहे. 2021 मध्ये बाहेर पडलेल्या ‘बॅच’मधील 64.35 टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वीच ‘प्लेसमेन्ट’ मिळाले होते. IIIT Nagpur-placement नागपूर शहर आता मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून ओळख बनविणार्या नागपूरसाठी ही निश्चितच सकारात्मक बाब असल्याची माहिती आयआयआयटीचे संचालक डॉ.ओ.जी.काकडे यांनी दिली. IIIT Nagpur-placement ‘ट्रीपल आयटी’मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी व संगणक विज्ञान व अभियांत्रिकी या दोन महत्त्वाच्या शाखा आहेत. यातील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील सर्वाधिक विद्यार्थी मुलाखतींसाठी पात्र ठरतात. IIIT Nagpur-placement एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होताच ‘ऑफर लेटर्स’मिळत असल्याची माहिती कैलास डाखले यांनी दिली.
केंद्र शासनाकडून नागपूरच्या आयआयआयटीला मान्यता मिळाल्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये या प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. IIIT Nagpur-placement महाराष्ट्र सरकार आणि गुगलच्या सहकार्याने आयआयआयटी नागपूर येथे अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येणार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. IIIT Nagpur-placement त्यामुळे नागपूरच्या आयआयआयटीचे महत्व वाढले आहे. बुटीबोरीजवळील वारंगा येथे आयआयआयटी करिता 100 एकर जमीन देण्यात आली असून शैक्षणिक संकुल तयार करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने वसतिगृह, प्रशासकीय इमारत, निवासी परिसराचा समावेश आहे.
IIIT Nagpur-placement पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाले असून आयआयआयटीच्या परिसरात सुसज्ज वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, सेमिनार हॉल, कॉन्फरन्स हॉल, लायब्ररी, रीडिंग रूम, कॅफेटेरिया, 24 तास वायफाय आदी सुविधा उपलब्ध आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेकडे सर्व सुविधायुक्त असे होस्टल असून अत्याधुनिक व्यायामशाळा आहे. IIIT Nagpur-placement विद्यार्थ्यांसाठी बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, खेळाचे मैदान, रात्रीचे कॅन्टीन, दैनंदिन गरजेच्या वस्तूकरिता दुकान याच परिसरात आहे. इलेक्ट्रिक सबस्टेशन, डिझेल जनरेटर सेट, पाणी ट्रीटमेंट प्लांट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आले असून आगामी काळात ओपन थिएटर, सुशोभित कारंजे, अंतर्गत रस्ते, वृक्षारोपण आणि लॉन्स, लँडस्केपिंग, पार्किंग आदींची व्यवस्था केल्या जाणार आहे.IIIT Nagpur-placement

IIIT Nagpur-placement भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक वार्षिक वेतनाचे ‘पॅकेज’मिळत असल्याने बुटीबोरीजवळील वारंगा येथील ‘ट्रीपल आयटी’चे महत्व वाढले आहे. IIIT Nagpur-placement सन 2016-17 मध्ये नागपुरात ‘ट्रीपल आयटी’ची सुरुवात झाली. देशभरातील सर्वोत्तम ‘ट्रीपल आयटी’तील नवीन संस्थांमध्ये नागपूरचा समावेश होतो. कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रसार झाल्यामुळे संस्थेचा लोकार्पण सोहळा करता आला नव्हता मात्र आता हा लोकार्पण सोहळा 24 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती आयआयआयटीचे संचालक डॉ. ओ. जी. काकडे यांनी पत्रपरिषदेत दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा.कृपाल तुमाने यांच्या प्रमुख उपस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या परिसरात लोकार्पण कार्यक्रम होईल. IIIT Nagpur-placement पत्रपरिषदेला कुलसचिव कैलास डाखले, कुलसचिव, सहयोगी अधिष्ठाता मयूर पराते, प्रा.डॉ. तपन जैन, मीरा जगदाळे आदी उपस्थित होते.