IPL च्या 17 व्या आवृत्तीचे वेळापत्रक जाहीर...

पहिला सामना 22 मार्च रोजी होणार...

    दिनांक :22-Feb-2024
Total Views |
नवी दिल्ली,
IPL 2024 Schedule Announced : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या आवृत्तीचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. या T20 लीगचा पहिला टप्पा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. सलामीच्या लढतीत सध्याचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. CSK ची कमान महेंद्रसिंग धोनीच्या हातात आहे. देशातील आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, पहिल्या 17 दिवसांसाठी आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. याआधी 2019 मध्ये देखील आयपीएलचे वेगवेगळ्या टप्प्यात आयोजन करण्यात आले होते.
 
 
ipl
 
 
 
आयपीएलच्या माध्यमातून २०२४ च्या टी२० विश्वचषकाची तयारी
 
 
ipl
 
 
 
भारतासह परदेशी खेळाडू आयपीएलच्या माध्यमातून आगामी टी-20 विश्वचषक 2024 साठी तयारी करतील. या वर्षी जून-जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. निवडकर्ते आपापल्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवतील.
 
मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल 2024 मधून बाहेर आहे. शमी सध्या टाचेच्या दुखापतीने त्रस्त आहे. यातून सावरण्यासाठी त्याला शस्त्रक्रियेची गरज आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत त्याच्यावर ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया होऊ शकते. शमीचे संपूर्ण आयपीएल 2024 सीझनमधून बाहेर पडणे हा गुजरात जायंट्ससाठी मोठा धक्का आहे.
 
IPL 2024 च्या लिलावात 72 खेळाडू विकले गेले
यापूर्वी डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल 2024 च्या लिलावात एकूण 72 खेळाडूंची विक्री झाली होती. यामध्ये 30 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. एकूण 10 फ्रँचायझींनी 230.45 कोटी रुपये खर्च केले. या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला सर्वात महागात विकत घेतले. KKR ने स्टार्कला 20.75 कोटी रुपयांना विकत घेतले आणि तो या लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना, तर न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला चेन्नईने 14 कोटी रुपयांना खरेदी केले.