नागपूर,
Box Langdi नेपाळ मध्ये पोखरा येथे दिनांक २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित इंटरनॅशनल बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेले नूतन भारत विद्यालयाचे विद्यार्थी रवाना झाले. बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ नागपूर डिस्टिकचे प्याट्रोन रमेश बक्षी, संदीप शास्त्री असोसिएशनचे अध्यक्ष संजय त्रिवेदी, उपाध्यक्ष भावेश कुचनवार, महासचिव डॉ वंदना बडवाईक, सहसचिव राहुल पेठे, सदस्य ललित तपासे, डॉ गुंजन बडवाईक, डॉ. पलाश बडवाईक, रवी निमसरकार, सेवकराम बावनकर यांनी भारताच्या टीम मधील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.नूतन भारत विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रणय सुखदेवे यांचे इंटरनॅशनल बॉक्स लंगडी कोच व मॅनेजर म्हणून राजश्री चव्हाण व सीमा बांगरे यांची निवड करण्यात आली आहे.
मुलींच्या गटामध्ये चेतना हमने( कर्णधार) , अश्विनी शिंदे, संतोषी ठाकरे, तेजस्विनी पवार, शिवस्वी बांगरे,मुलांच्या गटामध्ये आभास सेलोकर, नैतिक गोंधोळे, शिवम कठाणे, अनुराग कठाणे, यश कठाणे, तर सिनिअर गटांमध्ये काजल चव्हाण ( कर्णधार) आदिती पवार, यश चव्हाण या सर्व नूतन भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भारताच्या टीम मध्ये निवड होऊन ते स्पर्धेसाठी रवाना झाले. Box Langdi याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र