पुसद,
पुसद येथील बहुआयामी समाजशील व्यक्तीमत्त्व माजी आमदार डॉ. पंजाबराव देशमुख यांचा स्मृतीदिन साजरा झाला. याप्रसंगी पुणे येथील स्ट्रेस रिलिफ फाऊंडेशनचे अध्यक्ष योगतज्ञ व हास्यमूर्ती Ashok Deshmukh अशोक देशमुख व्याख्याते होते. कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ पत्रकार न. मा. जोशी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना पुसदच्या भूमीतला लहान माणसांना स्वत: मोठेपण देणारा मोठ्या मनाचा-दिलदार माणूस अशा शब्दांत आदरांजली वाहिली.
अशोक देशमुख यांच्या व्या‘यानाचा विषयच ‘हसतखेळत तणावमुक्ती’ हा होता. पायाला जणू भिंगरी असल्यागत हातात माईक घेवून दीड तास पुरुष महिलांच्या पुढ्यात जाऊन त्यांनी सतत श्रोत्यांना खिळवून ठेवले हे त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले. स्पष्ट भीडमुर्वत माणसाच्या दैनंदिन जीवनात होणार्या चुका आणि एकंदरच सवयी त्यांनी हास्य विनोदाने कथन केल्या. ‘हसण्यासाठी जन्म आपुला’ हे मर्म त्यांनी सरळ सोप्या उदाहरणांसह मांडले. घरादारात नवरा बायकोत गोड समन्वय असावा. जेवताना सर्वांनी गोलाकार मांडी घालून बसावे. घरात तसेच घराबाहेर पडताना मन आनंदी असावे, असे ते म्हणाले.
प्रत्येकाशी बोलणं वागणं चालणं नम‘तेचं ठेवा. काय कसे व कुठे बोलायचे याचे भान ठेवा. जीवनात ताणतणाव केव्हा येतील हे सांगता यायचे नाहीत. ज्यांनी समस्त लोकांना आत्महत्येपासून प्रवृत्त केले त्याच भय्यू महाराजांनी एका क्षणी आत्महत्या केली. तणावापासून दूर रहायचे असेल तर सदैव आनंदात वेळ घालावा, असे ते म्हणाले. श्वासविकार व भावना यांचा निकटचा संबंध आहे. दिवसभराच्या दगदगीतून वेळ काढून काही क्षण कपालभाती, अनुलोम-विलोम, भस्रिका, नाकावाटे नादब‘ह्म, तसेच पोटदुखी गुडघेदुखीसाठी काही क्षण शारीरिक संचालन करा. नाहीच जमले तर खुर्चीत पाय हलवत बसा, योग आणि झोप नियमित घ्या. शक्यतो पाठीवर झोपा, टाळ्या वाजवा, असे Ashok Deshmukh अशोक देशमुखांनी आवर्जून सांगितले.
भाषणादरम्यान उपस्थित मान्यवर, आमदार तसेच महिलांची विनोदी हावभाव करीत त्यांनी झाडाझडती घेतली तेव्हा सारे श्रोते हास्यकल्लोळात बुडाले. प्रारंभी संस्थाप्रमुख अॅड. आशिष देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अतिथींनी छत्रपती शिवाजी महाराज, गुणवंतराव देशमुख व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. संचालन अजय खैरे यांनी केले, तर आभार आकाश पोले यांनी मानले.