गोंदिया,
Accident : कर्तव्यावरुन स्वगावी जाणार्या पोलिस कर्मचार्यांचा रस्ता अपघातात मुरदोली शिवारात 24 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता मृत्यू झाला. तर अपघात एक जण गंभीर झाला. भुपेश कृष्णा औरासे (28 रा.देवरी) असे मृत पोलिस कर्मचार्याचे नाव आहे.
भुपेश औरासे हे आमगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असून शनिवारी कर्तव्य आटपून शैलेश भोई याच्यासोबत दुचाकीने देवरी येथे जात होते. या मार्गाचे बांधकाम सुरु असून रस्त्यावर बांधकामासाठी वापरले जाणारे वाहने ठेवली जातात. अशात मुरदोली शिवारात ठेवलेल्या मिक्सर मशिनवर दुचाकी आदळून भुवेश औरासे यांचा जागीच मृत्यू झाला. तर शैलेश भोई हे गंभीर जखमी झाले. शैलेशवर देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देवरी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.