नागपूर,
Prof. Namdev Jadhav प्रसिद्ध शिव व्याख्याते आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे 13 वे वंशज, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे( पुणे ) अध्यक्ष - प्रा.नामदेव जाधव यांचे छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरू या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सक्करदरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृहात संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत डॉ.राजे मुधोजी भोंसले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सुरुवातीला दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण कार्यक्रम सुरु करण्यात आला.Prof. Namdev Jadhav मुख्य वक्ते प्रा नामदेव जाधव यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री प्रविण शिर्के,शिरीष राजेशिर्के, डॉ.प्रकाश मोहिते, अनुप जाधव, सतीश मोहिते,नरेंद्र मोहिते,अविनाश घोगले, महेंद्र शिंदे, हरीश इंगळे यांचेसह मान्यवर समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण यांनी तर आभार अनिता जाधव यांनी मानले.
सौजन्य :अरविंद पाठक,संपर्क मित्र