डॉ. संजय भारती स्मृतीनिमित्य नि:शुल्क नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर

    दिनांक :26-Feb-2024
Total Views |
- 700 विद्यार्थी व पालकांची नेत्र तपासणी

आर्णी, 
श्री दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. डॉ. संजय भारती आपल्या संस्थेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम असावे याकडे सातत्याने लक्ष पुरवीत असत. त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्य वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नेत्ररोग विभाग आणि श्री दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित सर्व शाळा व महाविद्यालयांनी आपले विद्यार्थी व त्यांच्या पालकांकरिता Nishulk Netra Tapasani नि:शुल्क नेत्रतपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिराचा अभिनव उपक‘म आयोजित केला.
 
 
y26Feb-Motibindu
 
काही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ दृष्टीदोष असून त्यांना फळ्यावरील, स्मार्टबोर्डवरील अक्षरे, चित्रे स्पष्ट दिसत नाहीत. असे विद्यार्थी अभ्यासात मागे पडतात. असे होऊ नये यासाठी ज्या विद्यार्थ्यांना स्पष्ट दिसत नसेल, त्यांना चष्मा लागण्याची शक्यता असेल, अशा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना विनामूल्य चष्मे पुरविण्याचा संकल्प श्री दत्त प्रासादिक मंडळाचे सचिव अ‍ॅड. सिद्धार्थ भारती यांनी पूर्ण केला. विद्यार्थ्यांचे कुटुंबही संस्थेचेच कुटुंब आहे याविचाराने ज्या विद्यार्थ्यांचे आईवडील किंवा आजीआजोबा मोतीबिंदूमुळे नीट बघू शकत नसतील. आर्थिकदृष्ट्या त्यांना उपचार घेणे शक्य होत नसेल तर त्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांचेही नेत्रतज्ञांकडून मोतीबिंदूचे विनामूल्य ऑपरेशन करण्यात येणार आहे. या शिबिराला विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून सुमारे 700 विद्यार्थी विद्यार्थीनी व पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
 
 
 
Nishulk Netra Tapasani  शिबिराचा प्रारंभ श्री दत्त प्रासादिक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. किरण भारती यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. या शिबिराकरिता यवतमाळ येथील नेत्रतज्ञ तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्‍या डॉ. संगीता चव्हाण यांनी अत्याधुनिक नेत्र तपासणी यंत्रासह उपस्थित राहून विनामूल्य सेवा दिली. डॉ. गिरीश जतकर यांच्या विशेष सहकार्याने आणि वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय तथा रुग्णालय येथील डॉ. निखिल चांदोरे, डॉ. उमेर तयबानी, डॉ. सादिक बेनिवले, सोहम गायधने, सम्यक सिसले, नितेश राठोड यांच्या पथकाने टीमने अथक परिश्रम करीत सर्व शिबिरार्थींची तपासणी करून औषधोपचार केले.
 
 
Nishulk Netra Tapasani  याप्रसंगी सचिव सिद्धार्थ भारती, उपाध्यक्ष समृद्ध भारती, प्रा. डॉ. शशिकांत वानखडे, प्राचार्य डॉ. पिस्तुलकर, संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक अमोल जगताप, मुख्याध्यापक अमोल मंगाम, मुख्याध्यापक अशोक मुनेश्वर, मुख्याध्यापक रवींद्र कोट्टावार, अपर्णा गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक‘मासाठी श्री. म. द. भारती मुख्य शाळा, कन्या शाळा, श्री म. द. भारती गांधीनगर माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, इंग्लिश मिडियम स्कूलचे शिक्षक व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. शिबिराला विद्यार्थी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.