खामगाव-जालना रेल्वे मार्ग राज्य देणार 50 टक्के मदतनिधी

*शतकोत्तर प्रलंबित मागणी पूर्णत्वाकडे

    दिनांक :28-Feb-2024
Total Views |
बुलढाणा, 
Khamgaon-Jalna Railway Line : गेल्या 114 वर्षांपासूनच्या प्रलंबित खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी राज्याच्या 50 टक्के निधी देण्यास 27 फेब्रुवारी रोजीच्या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली आहे. खा. प्रतापराव जाधव तसेच विधानसभा लोकप्रतिनिधी यांनी ही मागणी लावून धरली होती. ती आता पूर्णत्वाकडे जात आहे.
 
 
SAFJKL
 
 
या मार्गामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक, आरोग्य, कृषी, औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळून प्रवासाचीही सुविधा मिळू शकते. त्याअनुषंगाने 2009 पासून खा. जाधवांनी हा मुद्दा रेटला होता. 2011 मध्ये यासाठी 1026.67 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक रेल्वे बोर्डाकडे सादर झाले होते. तेव्हापासून या रेल्वे मार्गासाठी खा. जाधव यांचा पाठपुरावा सुरू होता. 2021 मध्ये या रेल्वे मार्गासाठी फायनल सर्वेक्षण झाले होते. 2022 मध्ये मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भूमी अधिग्रहण व रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याबाबत पत्रव्यवहारही झाला होता. जानेवारी 2023 मध्ये उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री फडणवीस यांच्याकडे राज्याच्या 50 टक्के वाट्याचा करारनामा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यास आता यश आले आहे. दरम्यान यासाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. डॉ. संजय कुटे, आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. अ‍ॅड. आकाश फुडकर, आ. श्वेता महाले, आ. संजय गायकवाड यांनीही सहकार्य केले होते.
  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुर्ण केले आश्वासन.
 
जिल्हयामध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान खामगांव येथे आयोजीत प्रचार सभेमध्ये 7 ऑक्टोंबर 2014 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रीत करण्यात आले होते. यावेळी त्यांना जिल्हयाची भाग्यरेखा असलेल्या खामगांव-जालना रेल्वे मार्गाची आवश्यकता पटवुन देण्यात आली होती. तेव्हा त्यांनी सभेत राज्यात जर आपले सरकार आले तर खामगांव -जालना रेल्वे मार्ग पुर्ण करुन असे आश्वासन दिले होते. आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुर्ण केल्याने जिल्हयातील नागरीकांत आनंदाचे वातावरण आहे.