सांदीपनि शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा

28 Feb 2024 16:56:26
 
smita 
 
नागपूर
Sandipani school सांदीपनि शाळेत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला .हीच आमची प्रार्थना या गीताने सुरुवात झाली. मराठी भाषा दिनाचे महत्त्व तसेच सुविचार प्रस्तुत केला गेला .पाचवीच्या विद्यार्थ्यांनी कविता सामूहिक स्वरूपात सादर केली .या निमित्त मराठी भाषेचे महत्त्व विशद करणारा व्हिडिओ दाखविण्यात आला .महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली .सर्व मान्यवरांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सौजन्य:स्मिता बोकारे,संपर्क मित्र  
Powered By Sangraha 9.0