बार्टीच्या धर्तीवर ‘आर्टी’ची स्थापना झाल्याने राज्यातील मातंग समाजाला दिलासा

29 Feb 2024 19:27:52
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
Matang Samaj : अनुसूचित जातीमधील समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (बार्टी) स्थापना झाली होती त्याच धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र (आर्टी)ची स्थापना झाल्याने मातंग समाजाला मोठा दिलासा मिळाला असून यामुळे मातंग समाजाच्या उन्नतीसाठी ही स्थापना मैलाचा दगड ठरणार आहे.
 
 
 
y29Feb-Namdev
 
 
शासनाने स्थापन केलेले बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र ( बार्टी ) अनुसूचित जातीमध्ये असलेल्या 59 जातीसाठी काम करते. परंतु या केंद्राच्या स्थापनेपासून एका विशिष्ट जातीला याचा लाभ मिळत असल्याने बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करावी अशी मागणी मातंग समाजाचे उमरखेड महागाव विधानसभेतील आमदार नामदेव ससाने व पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी राज्य शासनाकडे लावून धरली होती.
 
बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राला 325 करोड रुपये अर्थसहाय्य मिळते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रदेशात शिक्षण व्यवसाय प्रशिक्षण यास विद्यार्थी व समाजाच्या उन्नतीसाठी हा निधी खर्च करण्यात येतो. परंतु बार्टीच्या स्थापनेपासून अनुसूचित जाती मधील 59 जाती पैकी एका विशिष्ट जातीला याचा जास्त लाभ मिळत होता. त्यामुळे मातंग समाजाच्या उन्नतीसाठी बार्टी प्रमाणे आर्टी स्थापन झाली पाहिजे व सामाजिक न्याय प्रक‘ीयेत समान वाटा मिळावा यासाठी आमदार नामदेव ससाने, सुनील कांबळे यांनी शासनाकडे मागणी केली होती.
 
अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र स्थापन झाल्यास मातंग समाजातील बेरोजगारी व अशिक्षितपणा दूर करण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची बाब या दोन्ही आमदारांनी राज्य शासनासमोर मांडली. यासंदर्भात उपमु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे मागील चार वर्षात चार बैठका या संदर्भाने मुंबई येथे लावण्यात आल्या. त्याची फलश्रुती या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी बार्टीच्या धर्तीवर आर्टी स्थापन करण्याची घोषणा केली.
 
यासाठी मु‘यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवल्याने आ. नामदेव ससाने व सुनील कांबळे या मातंग समाजाच्या भाजपमधील दोन्ही आमदारांनी त्यांचे आभार मानले आहेत.
मातंग समाजाच्या विकासाकरिता तसेच विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात समाजाची मागणी होती. त्या अनुषंगाने विधानसभा सदस्य म्हणून यावर सरकारचे लक्ष वेधले व त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केल्याने या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र स्थापनेची घोषणा केल्याने मातंग समाजाच्या विकासासाठी हे फार मोठे पाऊल ठरणार आहे.

नामदेव ससाने
आमदार उमरखेड विधानसभा
Powered By Sangraha 9.0