लेखी आश्वासाने विहिरीतील उपोषण मागे

03 Feb 2024 20:00:08
तभा वृत्तसेवा
चांदूरबाजार,
Aamran Uposhan : तालुक्यातील सोनोरी येथील विलास चर्जन यांनी ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावरील विहीर काढण्यासाठी 45 फूट खोलवर असलेल्या सार्वजनिक कोरड्या विहिरीत खाट टाकून आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणा दरम्यान प्रशासनाने अतिक्रमणाबाबत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने विलास चर्जन यांना विहिरीतील उपोषण मागे घेतले.
 
 
uposhamn
 
 
 
सोनोरी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर एक खाजगी विहीर आहे. या विहिरीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, शिवाय वाहन घरापर्यत पोहचू न शकत नसल्याने अपंग, रुग्णांना नाहक त्रास होत आहे. त्याकरिता विलास चर्जन यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार यांना वारंवार निवेदन दिले. परंतु प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे विलास चर्जन यांनी उपोषणाचे हत्यार उचलत गावातील सार्वजनिक विहिरीत खोल 45 फूट उतरून उपोषण सुरू केले होते.
 
विहिरीतील उपोषणाची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली व प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. उपोषणाच्या पाचव्या दिवशीच प्रशासन नरमले व अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले. लेखी आश्वासनामुळे विलास चर्जन यांनी उपोषण मागे घेतले. प्रशासनाने विलास चर्जन यांना टोपलीच्या सहाय्याने बाहेर काढले व डॉक्टरांनी त्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी गटविकास अधिकारी मोहन शृंगारे, ब्राह्मणवाडा थडी ठाणेदार उल्हास राठोड, वैद्यकीय अधिकारी अतुल जाधव, पोलिस पाटील सुधीर गणोरकर यांच्या हाताने लिंबुरस पिऊन चर्जन यांनी उपोषण मागे घेतले.
Powered By Sangraha 9.0