अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेने बदलले देशाचे चित्र

    दिनांक :03-Feb-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या रामललाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याचे भाग्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाभले असले तरी राममंदिर आंदोलनाचा आणि आक्रमक हिंदुत्वाचा पाया देशात Advani - Somnath to Ayodhya Ratha Yatra लालकृष्ण अडवाणी यांना घातला, हे विसरता येणार नाही. भाजपाचा आज जो देशव्यापी विस्तार झाला, त्याचे श्रेयही अडवाणी यांनाच द्यावे लागेल.
 
 
advani dksl
 
राममंदिर आंदोलनाला गती देण्यासाठी अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. 25 सप्टेंबर 1990 रोजी ही रथयात्रा सोमनाथवरुन सुरू झाली. भाजपाचे तत्कालुन महासचिव प्रमोद महाजन आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी अडवाणींच्या रथयात्रेचे सूत्रधार होते. उत्तर भारताताील दहा राज्यांतून प्रवास करीत 30 ऑक्टोबर 1990 ला ही रथयात्रा अयोध्येत पोहोचावी, असे नियोजन होते. मात्र, अयोध्येत पोहोचण्याच्या आधीच बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी 23 ऑक्टोबर 1990 रोजी समस्तीपूर येथे यात्रा अडवत लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली.
 
 
 
अटक झाल्यानंतर अडवाणी यांनी केंद्रातील विश्वनाथ प्रतापसिंह सरकारचा पाठिंबा काढला, त्यामुळे ते सरकारही पडले. अडवाणी यांची रथयात्रा प्रत्यक्ष अयोध्येत पोहोचू शकली नसली तरी, त्यांच्या रथयात्रेचा देशातील राजकारणावर दूरगामी परिणामी झाला. भाजपाचा देशव्यापी विस्तार झाला. गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात भाजपा मजबूत झाला. आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून देशात अडवाणी यांची प्रतिमा तयार झाली.
 
 
 
Advani - Somnath to Ayodhya Ratha Yatra : 1980 मध्ये स्थापन झालेल्या भाजपाला 1984 मध्ये झालेल्या आपल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत फक्त दोन जागा जिंकता आल्या होत्या. 1989 मध्ये भाजपाने 85 जागांपर्यंत मजल मारली. 1991 च्या निवडणुकीत तर भाजपाने प्रथमच तीन आकडी म्हणजे 120 जागा जिंकल्या. त्यानंतर भाजपाला कधीच मागे वळून पाहावे लागले नाही. 1970 मे 1989 पयर्र्ंत अडवाणी राज्यसभेत होते. 1991 मध्ये प्रथमच त्यांनी लखनौ आणि गांधीनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले. नंतर त्यांनी गांधीनगरच्या जागेचा राजीनामा देत लखनौची जागा कायम ठेवली. 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये अडवाणी गांधीनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम केलेले अडवाणी अटलबिहारी यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. 2002 ते 2004 या काळात देशाचे उपपंतप्रधानपदही त्यांनी भूषवले.